SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी 3 महागड्या कार खरेदी केल्या आहेत. या 3 कारच्या किंमतीत 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 18, 2026, 23:26 IST | Updated: Nov 18, 2026, 23:31 IST
Join

Aaron Vicky Thomas : नवी मुंबईतील एका तरुणाने  एकाच दिवसात तीन रोल्स-रॉइस कार विकत घेतल्या आहेत. या 3 कारची एकत्रित किंमत 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील. या तरुणाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.  ही डिलिव्हरी भारतातील एका दिवसातील सर्वात महागडी कार डिलिव्हरी म्हणून ओळखली जात आहे.

ॲरॉन विकी थॉमस असे या तरुणाचे नाव आहे. ॲरॉन विकी थॉमस याने एक रोल्स रॉयस फँटम आणि दोन रोल्स रॉयस कलिनन सिरीज-2 अशा 3 महागड्या कार खरेदी केल्या आहेत. या तिनही कारची एकूण किंमत 50 कोटी आहे. फँटम कारवर ‘स्पिरिट ऑफ एक्स्टसी’ लोगो हा. हा लोगो सोन्याचा आहे. या कारवर  हे चिन्ह चांदीच्या किंवा क्रोम रंगात असते. पण ॲरॉन खरेदी केलेल्या कारवर सोन्याच लोगो आहे.

ही भारतातील सर्वाधिक महागडी फँटम असल्याचा दावाही करण्यात आला आहे.या कारचे इंटेरियर देखील तितकेच महाग आहे. इंटेरियरच्या खर्चात 10-12 कार खरेदी करता येतील. ॲरॉन याने खरेदी केलेल्या कलिनन सिरीज-2 या प्रकारातील कार ही रोल्स रॉयसची आलिशान एसयूव्ही आहे. या कारमध्ये 6.75 लिटर क्षमतेचे ट्विन टर्बो व्ही-12 पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 571 हॉर्सपावर आणि 850 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. भारतात  या कारची किंमत 10 कोटीपेंक्षा जास्त आहे. जर ग्राहकांनी यात काही बदल केले तर यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. 

ॲरॉन विकी थॉमस  कोण आहे?

ॲरॉन विकी थॉमस  याचे कुटुंब नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायात आहे. त्यांची ईव्ही होम्स कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी आहे. वाशी, कोपरखैरणे यांसह नवी मुंबईतील अनेक परिसरात यांचे गृहनिर्माण प्रोजेक्ट आहेत. या कंपनीचा टर्नओव्हर किती आहे याचा तपशील समोर आलेला नाही. मात्र, कंपनीच्या वेबसाईवर या कंपनीच्या प्रकल्पांची माहिती प्रसिद्ध झालेली आहे. त्यानुसार कंपनीची आर्थिक उलाढाल अनेक कोटींची असू शकते. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES