ऐरोली-घणसोली खाडीपुलाचे लोकार्पण लवकरच होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे काम आत्ता वेगाने सुरू असून जवळपास 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, येत्या 10 महिन्यांत काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळं नव्या वर्षात हा महत्त्वकांक्षी प्रकल्प नागरिकांच्या सेवेत येणार आहे.
ऐरोली- घणसोली खाडीपुल गेल्या 20 वर्षांपासून लालफितीत अडकलेल्या अडकलेला होता. परवानग्याच्या गराड्यात सापडलेल्या या प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळाली आहे. सुरुवातीला या प्रकल्पाचे काम सिडकोकडे देण्यात येणार होते. 2003 मध्ये तसे नियोजनही करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव सिडकोने हे काम केलेच नाही. त्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने हा महत्त्वकांक्षी पूलाचे काम आपल्या खांद्यावर घेतले.
ऐरोली आणि घणसोलीला जोडणारा हा पूल 3.47 किमी लांबीचा आहे. या प्रकल्पावर एकूण खर्च सुमारे 614 कोटी रुपये इतका आहे. त्यापैकी काही खर्चा हा सिडकोच्या माध्यमातून केला जाणार आहे. या कामाची वर्कऑर्डर 2024मध्ये काढण्यात आली. मात्र पूल खाडीतून जाणारा असल्याने महापालिकेच्या वन विभागासह अन्य प्राधिकरणांच्या परवानग्या घाव्या लागल्या होत्या. त्यामुळं या कामाला तब्बल एक वर्ष उशीर झाला. 2025मध्ये हे काम सुरू झाले.
ऐरीलो घणसोली पुलाचे काम वेगाने सुरू असून सर्वच पिलर उभे केले आहेत. उर्वरित काम येत्या 10 महिन्यांत पूर्ण होणार आहे. या पुलाला समांतर सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई विमानतळाकडे जाणारा एक मार्ग तयार करण्यात येणार आहे. ऐरोली-घणसोली पुलामुळं ठाणे-बेलापूर मार्ग आणि ऐरोलीतील वाहतुकीची समस्या फुटणार आहे.
घणसोली-ऐरोली खाडी पूल हा सहा पदरी असून पुढे मुलुंड-ऐरोली खाडीपुलासह ऐरोली काटई रस्त्याला जोडण्यातयेणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी कमी करणे आणि पाम बीच मार्गाला थेट ऐरोलीशी जोडणे हा या पूलाचा उद्देश आहे.
ऐरोली-घणसोली खाडीपुलाच्या कामाचा खर्च नवी मुंबई महापालिका आणि सिडको दोन्हीही अर्धा अर्धा करणार आहेत. मात्र काम 60 टक्के झाले असले तरी सिडकोचा हिस्सा अद्याप आलेला नाही. महापालिकेने मात्र या हिश्श्याची वाट न पाहता पुलाचे काम सुरु ठेवले आहे, अशी माहिती समोर येतेय.