SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सुनील तटकरेंवरील आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा नेताही सहमत! म्हणाला 'करंगळ्या कापून....'

रामदास कदम यांनी सुनील तटकरेंवर केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा नेताही सहमत आहे. सुनील तटकरेंची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही नेत्याने केली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 09, 2026, 17:03 IST | Updated: Nov 09, 2026, 17:07 IST
Image Credit: amol mitkari on Ramdas Kadam
Join

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या दाव्यानंतर खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर रामदास कदम यांनी गंभीर आरोप केला आहे. अजित पवाराच्या विमानाचा अपघात नसून घातपात आहे, असा संशय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनाही आहेत. तर सुनील तटकरेंची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

'सोमवती अमावस्येला करंगळ्या कापल्यात'

राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी म्हणाले की,  नुसतं रामदास साहेबांच घातपाताचा संशय नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला हा संशय आहे. अजित पवारांच्या विमानाचा खरंच अपघात होता की घातपात झाला होता. मी स्वत:हा आपल्याला सांगितलं होतं की, सुरुवातीपासून या गोष्टीचा पाठपुरावा करतोय. की अजित पवारांच्या विमान अपघाताला काळ्या जादूची सुद्धा  किनार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या करता पोलीस महासंचालक ज्या तपास अधिकारी आहेत, तेजस्वी सातपुते यांना मी भेटून काही पुरावे देखील दिले आहेत.  दोन अघोरी पूजेबद्दल सांगितलं आहे. तर ही पूजा कोणी केली तर खरात भक्तांनी केली. सोमवती अमावस्येला करंगळ्या कापल्यात. त्यामुळे थोरात साहेब या अनुषंगाने सुद्धा एसआयटीकडून तपास व्हावा. यासंदर्भात मी पाठपुरावा करत आहेत. हा तपास करुन आमच्यासह महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील शंका दूर कराव्यात. कोणावर आरोप करणे हे ठीक आहे, पण ते सिद्ध करणे ही तितक्य महत्त्वाचे आहे.  तर अजित पवारांच्या विमानाचा अपघात नसून तो घातपात आहे, या मुद्दावर आम्ही ठाम आहोत. अगदी कोणीही असो त्याची चौकशी झाली पाहिजे. मी जरी या संशयाच्या भोवऱ्यात असेल तर माझीही चौकशी झालीच पाहिजे.

आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी गांभीर्याने...

हे काही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकं बोलत नाहीय, जर आम्ही कोणी बोललं असतो तर आमची हकालपट्टी झाली असती किंवा संपवण्याचा प्रकार झाला असता. आम्ही पक्षातून संपलोच आहोत. आमदार महेंद्र थोरवे हे एकनाथ शिंदेंचे आमदार आहेत, रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. ही लोकं शंका उपस्थिती करत असतील आणि सगळ्यांना शंका येत असतील तर आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. एकाच व्यक्तीबद्दल शंका येते, त्यांच्या भूमिकेबद्दल शंका घेत असतील तर मला सांगा ना राम राज्यामध्ये सीतेच्या चारित्र्यावर संशय घेतला, तर रामाने सीतेला वनवासावर पाठवलं. मग अशा पद्धतीने कोणावर शंका असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, एवढंच आमची मागणी आहे. सातत्याने त्यांच्यावर का आरोप होतात याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. याचं उत्तर आम्ही कसं देणार. आमच्या मनात शंका इतकीच आहे, अजित पवारांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात झाला आहे.  

आमचा उमेश पाटलांना प्रश्न आहे, तुम्ही जर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहात, तर वेळ आल्यावर सांगू म्हणजे वेळ नेमकी कोणती २०२९, २०३० , २०३१, हे काय उत्तर देत नाहीत.  शेवटी ते राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. त्यांना कीह बोलून त्यांचं अस्थित्व धोक्यात आणायचं नाहीय. त्यामुळे इतक्या मोठ्या राष्ट्रीय प्रवक्त्यावर सामान्य माणूस काय बोलणार. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES