शिंदेंच्या वकिलांना आता कोर्टात बोलता येणार नाही, एका तासात शिवसेनेची सुनावणी संपेल? असिम सरोदे यांचा सर्वात मोठा दावा
शिंदेंच्या वकिलांना आता कोर्टात बोलता येणार नाही, एका तासात शिवसेनेची सुनावणी संपेल? असिम सरोदे यांनी आजच सांगितले उद्या कोर्टात काय होणार?
Asim Sarode On Shivsena Supreme Court Hearing : सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सुरु आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला आहे. आता ही सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद करत शिंदेंच्या शिवसेनेला घेरलं आहे. कपिल सिब्बल पुन्हा एकदा बाजू मांडणार आहेत. शिंदेंच्या वकिलांना आता कोर्टात बोलता येणार नाही. एका तासात शिवसेनेची सुनावणी संपेल असं म्हणत वकिल असिम सरोदे यांनी पुढील सुनावणीत कोर्टात काय होणार याबाबत मोठा दावा केला आहे.
सुनावणी दरम्यान असीम सरोदे सुप्रीम कोर्टात हजर होते. यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना आजच्या सुनावणीत उपस्थित झालेले मुद्दे तसेच पुढील सुनावणीत काय होणार यावर भाष्य केले. राहुल नार्वेंकर यांना विधानसभा अध्यक्ष करणे पक्ष विरोधी कृती आहे. शिवसेनेच्या फुटीर आमदारांनी त्यांना पाठिंबा देणे. यानंतर भरत गोगलवे यांना मान्यता देणे की तेच व्हीप आहेत. हे सर्व मुद्दे सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांनी बेकादेशीर ठरवले आहेत. यामुळे कोर्टाला मान्य करावे लागेल असा दावा असीम सरोदे यांनी केला.
शिंदेंच्या आमदारांबाबत बोलताना राहुल नार्वेकरांनी म्हंटले हा पक्षांतर्गत वादाचा मुद्दा आहे. तर, त्यांनी त्यांच्या मान्यतेबाबतचा निर्णय का घेतला. पक्षांतर्गत वादाचे प्रकरण आहे, असे सांगून न्यायालालयाकडे पाठवायचे असे का केला नाही असा सवाल कपिव सिब्बल यांनी उपस्तित केला.
एका तासात सुनावणी संपेल
एक तास कपिल सिब्बस यांना दिला तर पूर्ण विषयावर ते बाजू मांडतील आणि पूर्ण विषयावर एका तासात युक्तीवाद होईल. नंतर फक्त निर्णयसाठी विषय राखीव ठेवता येईल. यामुळे एका तासात सुनावणी संपले आणि न्यायालय अंतिम निर्णय देऊ शकतो असा म्हणत असीम समोरे यांनी थेट निकालाबाबत मोठा दावा केला आहे. संविधाच्या बाजूने विचार केला. तर संविधानाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला आहे.
वैचारिक मतभेद असणे हे डिसेंट असू शकत नाही. वैचारिक मतभेद होते तर मग अडीच वर्षे तुम्ही सरकारमध्ये काय करत होता असा सवाल असिम सरोदे यांनी केला, पक्ष सोडून जातात त्यांची वागणूक पहायची की उद्धव ठाकरे यांच्या वागणुकीची पाहणी करायची? विधिमंडळ बहुमताच्या आधारे राजकीय पक्ष देणे, हे कायदेशीररित्या चुकीचे असल्याचे सिब्बल यांनी कोर्टात मांडले.
निवडणूक पूर्व युती कोणाशी होती आणि नंतर कोणाशी आघाडी केली हा गौण मुद्दा आहे. आमदार अपात्रता प्रकरण हा अकॅडमीक मुद्दा नाही. बहुमताचे स्वरूप लक्षात घेऊन अशा राजकीय हालचाली केल्या जातात, सध्या जे घडत आहे, ते याचाच भाग आहे अस असीम सरोदे म्हणाले.