• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /पळस्पेची वाहतुक कोंडी फुटणार, मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी आणखी एक महामार्ग, नवी मुंबईत 20 मिनिटांत पोहोचणार

पळस्पेची वाहतुक कोंडी फुटणार, मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी आणखी एक महामार्ग, नवी मुंबईत 20 मिनिटांत पोहोचणार

अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी जोडणाऱ्या नवी मुंबईतील 7.35 किलोमीटर लांबीच्या सहापदरी उन्नत मार्गाचे 67 टक्के काम पूर्ण झाले आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 29, 2026, 13:52 IST|Updated: Nov 29, 2026, 13:56 IST
joinshare
पळस्पेची वाहतुक कोंडी फुटणार, मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी आणखी एक महामार्ग, नवी मुंबईत 20 मिनिटांत पोहोचणार
Image Credit: Atal Setu Mumbai Pune Expressway link reaches 67% completion

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई-पुणे या दोन महानगरातील अंतर आता आणखी कमी होणार आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी जोडणाऱ्या नवी मुंबईतील 7.35 किलोमीटर लांबीच्या सहापदरी उन्नत मार्गाचे 67 टक्के काम पूर्ण झाले आहे.

या नवीन प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते पुणे हा प्रवास अधिक वेगवान होणार असून मुंबई-पुणे हे अंतर अवघ्या दीड तासात पार करणे शक्य होणार आहे. एमएमआरडीएने प्रकल्पाचे काम फेब्रुवारी 2027पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, सध्याची प्रगती पाहता निर्धारित मुदतीत काम पूर्ण होण्याबाबत साशंकता आहे.

अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोडणारा 9.35 किलोमीटर लांबीचा सहापदरी उन्नत मार्ग तयार करण्यात येत आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) अटल सेतू जोडमार्गाचे काम सुरू. या प्रकल्पासाठी 1,420 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.  फेब्रुवारी 2027 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.

नवीन जोडमार्गामुळे मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूककोंडी आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार. दक्षिण मुंबईहून निघालेली वाहने विनासिग्नल पुण्याच्या दिशेने प्रवास करू शकणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू बंदर आणि पुणे-गोवा महामार्गाकडे जाणाऱ्या वाहतुकीलाही फायदा होणार.

नवीन मुंबई-पुणे महामार्गामुळं नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवासही लवकरच जलद होणार आहे. शिवडीपासून सुरू झालेला अटल सेतू नवी मुंबईत उतरतो. शिवाजीनगर इंटरचेंजपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्वतंत्र कोस्टल रोड उभारण्यात येणार.

6.5 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून या मार्गावर 808 मीटर लांबीचा डिस्ट्रिक्ट उन्नत मार्ग उभारण्यात येणार. दक्षिण मुंबईहून नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास 20 ते 25 मिनिटांत होण्याची शक्यता आहे.  अटल सेतूवरून येणाऱ्या वाहनांना पळस्पे येथे मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. नवीन जोडमार्गामुळे पनवेल मुख्य जंक्शन टाळून थेट मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवेश करता येणार. त्यामुळे पळस्पे येथील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Pune
Infrastructure news