• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /टायगर श्रॉफवर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोरांनी अंधेरीतील एका हॉटेलमध्येही केलेला गोळीबार; तपासादरम्यान विचित्र कारण समोर

टायगर श्रॉफवर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोरांनी अंधेरीतील एका हॉटेलमध्येही केलेला गोळीबार; तपासादरम्यान विचित्र कारण समोर

टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अत्यंत चिंताजनक माहिती समोर येतेय. पोलिसांनी आत्तापर्यंत 10 जणांना अटक केली आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 22, 2026, 10:57 AM IST|Updated: Oct 22, 2026, 11:04 AM IST
joinshare
टायगर श्रॉफवर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोरांनी अंधेरीतील एका हॉटेलमध्येही केलेला गोळीबार; तपासादरम्यान विचित्र कारण समोर
Image Credit: Tiger Shroff firing case

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

टायगर श्रॉफवर झालेल्या हल्लाप्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास करत देशभरात मोहिम राबवली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. आरोपींच्या चौकशीतून  दोन धक्कादायक माहिती समोर आली आहे.

टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी मुंबईजवळच्या एका ठिकाणी गोळीबाराचा सराव केला होता. एका आरोपीने पिस्तुलाची योग्य कार्यप्रणाली तपासण्यासाठी सराव म्हणून दोन गोळ्या झाडल्या, तर दुसऱ्याने एक गोळी झाडली, अशी माहिती समोर येत आहे.

दुसरी माहिती खूपच चिंताजनक आहे. दोन्ही आरोपी मुंबईतील अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये थांबले असताना, पिस्तुलाची चाचणी करत असताना एक गोळी सुटली आणि ती हॉटेलच्या खोलीतील पलंगाला लागली. मात्र, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना याची काहीच कल्पना नव्हती.

तिसरी माहितीदेखील याच पिस्तुलांशी संबंधित आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, गोळीबार केल्यानंतर आरोपींनी बंदूक सुरतमध्ये लपवून ठेवली होती. आरोपींनी त्यांचे मोबाईल फोनही त्याच ठिकाणी लपवले आहेत. आरोपींकडून ही माहिती मिळाल्यानंतर, पोलीस तिची पडताळणी करत असून सुरतमधील स्थानिक लोकांच्या मदतीने बंदूक आणि मोबाईलचा शोध घेतला जात आहे.

आरोपीची संख्या 10

टायगर श्रॉफवर गोळीबारासाठी वापरलेली पिस्तूल, काडतुसे अमृतसरमधून डेड लेटर बॉक्सपद्धतीने पुरविण्यात आली असून ते मुंबईत पाठविण्यासाठी प्रेयसी आणि तिच्या मैत्रिणीचाही वापर करण्यात आल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले. बिष्णोई टोळीतील अनिल पंडितच्या थेट संपर्कात असलेल्या कुणालने आपली प्रेयसी राधा वर्माला आणि तिने आपली मैत्रीण बबिताला या प्रकरणात ओढले. त्यांना केवळ 10 ते 12 हजार रुपये देवून शस्त्रे पाठविल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात सोनिपतमधून आणखी एका आरोपीची धरपकड करण्यात आली असून अटक आरोपींची संख्या 10 झाली आहे.

रणबीर कपूरच्या घराचीही रेकी

टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या आरोपींच्या   निशाण्यावर रणबीर कपूर होता अशी माहिती समोर येत आहे. इतकंच नव्हे तर, रणबीर कपूरच्या घराची रेकीदेखील केली होती.

सूत्रांची माहितीनुसार, गेल्या रविवारी अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. सूत्रांनुसार, टायगरवर हल्ला करणाऱ्या आरोपींनी बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूरच्या वांद्रे येथील घराची पाहणी (रेकी) देखील केली होती. या बातमीमुळे इंडस्ट्रीतही खळबळ उडाली आहे. रणबीर कपूर देखील हल्लेखोरांच्या निशाण्यावर असल्याचं सांगण्यात आलंय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Tiger Shroff
Mumbai News