• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /निकाल लागताच महायुतीच ठिणगी! मित्रपक्षाने युतीचा धर्म पाळला नाही, प्रवीण दरेकरांचा आरोप, 'धंगेकरांना वरुन आदेश आले...'

निकाल लागताच महायुतीच ठिणगी! मित्रपक्षाने युतीचा धर्म पाळला नाही, प्रवीण दरेकरांचा आरोप, 'धंगेकरांना वरुन आदेश आले...'

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, भाजपा, काँग्रेस व शिवसेना गटाचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले आहेत. पदवीधरच्या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळाल्याने महायुतीला धक्का बसला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 29, 2026, 02:20 PM IST|Updated: Oct 29, 2026, 02:32 PM IST
joinshare
निकाल लागताच महायुतीच ठिणगी! मित्रपक्षाने युतीचा धर्म पाळला नाही, प्रवीण दरेकरांचा आरोप, 'धंगेकरांना वरुन आदेश आले...'
Image Credit: मित्रपक्षाने युतीचा धर्म पाळला नाही, प्रवीण दरेकरांचा आरोप

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
मोठी बातमी! शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, पूर्णेकर प्रकरण भोवलं

मोठी बातमी! शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, पूर्णेकर प्रकरण भोवलं

2

दिवाळीच्या पहिला सण वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत, जाणून घ्या सणांची योग्य तिथी, शुभ मुहूर्त अन् पूजा विधी

3

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! तीन विश्वासातल्या माणसांनी साथ सोडली, मलिंगा सहित....

4

महाराष्ट्रात आणखी एक वंदे भारत; प्रवासाचा वेळ 7 तासांनी कमी होणार, 9 स्थानके अन्, तिकीट किती? पाहा संपूर्ण वेळापत्रक

5

नाशिकमध्ये खळबळ! रिटायर होण्याच्या 24 तास आधी मालेगाव महापालिका आयुक्ताला अटक

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, भाजपा, काँग्रेस व शिवसेना गटाचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले आहेत. पदवीधरच्या तिन्ही जागांवर  महाविकास आघाडीला विजय मिळाल्याने महायुतीला धक्का बसला आहे. दरम्यान या निकालानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडताना दिसत आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी मित्रपक्षांनी युतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप केला आहे. आम्ही महायुतीचा धर्म बजावला. पण महायुतीच्या घटकपक्षांनी हा धर्म बजावला नाही असं ते म्हणाले आहेत. महायुतीत राहून महायुतीच्या विरोधात भूमिका घेणं हे कोणालाच परवडणारं नाही असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

"पुण्याची जागा पडली कारण आमच्या मित्रपक्षाने आपले मतदार दुसऱ्या पक्षाकडे वळवले त्यामुळे फरक पडला. अन्यथा तिथे स्मिता जाधव निवडून आल्या असत्या. सर्व निकाल पाहिले तर भाजपा महायुतीचं प्रामाणिकपणे काम करत आहेत. अमरावती आणि इतर ठिकाणी जिथे भाजपाचे उमेदवार उभे राहिले तिथे आम्ही कारवाई केली आणि सहा वर्षासाठी निलंबन केलं. श्रीकांत देशपांडे, शिंदे आणि उमेदवार यांचं गणित केलं तर सरनाईकांना पराभवाला सामोरं जावं लागलं असतं. पण आम्ही महायुतीचा धर्म बजावला. पण महायुतीच्या घटकपक्षांनी हा धर्म बजावला नाही," असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

"मैत्रीपूर्ण लढत केली इथपर्यंत ठीक आहे. पण मित्रपक्षाला एनडीएच्या उमेदवाराला पराभूत करण्याचं काम आमच्या युतीपक्षाने केलं आहे. हे स्पष्ट आहे कारण रवींद्र धंगेकर यांनी निवडणुकीपूर्वी आवाहन केलं आहे आणि जिंकल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचा महत्त्वाचा नेता अशी भूमिका घेतो आणि हे वरुन आदेश आल्याशिवाय होत नाही. त्यामुळे याचं अवलोकन करता शिंदेंनी लक्ष घातलं पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली आहे.

"महाराष्ट्रातील जनतेने देवाभाऊंच्या, तेव्हा असणारे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सरकार बनवलं आहे. पण आपल्यात अशा कुरघोड्या होत असतील, तू मोठा की मी मोठा असे पलटवार होणार असतील तर महायुतीच्या भविष्यासाठी चांगलं नाही. आमचा पक्ष तर नेहमी आत्मचिंतन करतो, चुका दुरुस्त करतो आणि लोकांसमोर जातो. एकनाथ शिंदेंच्या पक्षानेही आपली भूमिका माध्यमांच्या माध्यमातून अतातायीपणे मांडू नये जेणेकरुन महायुतीत वितुष्ट होणार नाही," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

"दुसऱ्याच्या वरातीत नाचायचं तसं आपलं वाटोळं झालं आहे, लोकांनी शून्य केलं आहे याची जाण काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला नाही. ही विकृती आहे. काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली आहे, तीदेखील दुसऱ्या पसंतीची मतं आहे. काँग्रेसची परंपरागत जागा भाजपाने जिंकली आहे," अशी टीका त्यांनी केली. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pravin Darekar
BJP
Devendra Fadnavis
shiv sena