SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'राज ठाकरेंना टुरिझमची खाज असेल तर...', कर्जतमधील वृक्षतोडीनंतरच्या जंगल भेटीवरुन अमित साटमांचा हल्लाबोल; म्हणाले, 'राज पाकीस्तानचा...'

राज ठाकरेंनी कर्जतमध्ये ज्या ठिकाणी टोरंट कंपनीचा पंप स्टोरेज प्रकल्प राबवला जातोय तिथे भेट देऊन झालेल्या वृक्षतोडीची पहाणी केल्यानंतर याच मुद्द्यावर साटम यांनी थेट राज यांना लक्ष्य केलं आहे.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 30, 2026, 10:56 AM IST | Updated: Oct 30, 2026, 11:10 AM IST
Image Credit: राज ठाकरेंना अमित साटम यांनी केलं टार्गेट
Join

भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. कर्जत येथील पंप स्टोरेज प्रकल्पावरुन साटम यांनी मनसे अध्यक्षांना लक्ष्य केलं आहे. "काही उद्योग उरले नाहीत म्हणून कर्जतला जाऊन काही नेते, अभिनेते टुरिझम करतात," असा टोला राज यांनी केलेल्या कर्जत दौऱ्यावरुन लागवला आहे.  

डिलीटच करायचे तर...

पंतप्रधान मोदींसंदर्भातील व्हिडीओ पोलिसांच्या सांगण्यावरुन डिलीट करत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र यावरूनही साटम यांनी, "व्हिडीओ पोस्ट करुन डिलीट करणारे हे, डिलीटच करायचे तर पोस्ट करायचेच कशाला?" असा खोचक सवाल राज यांनी विचारला आहे.

नक्षली मनोवृत्तींना विरोधक मदतच करत आहेत

"कर्जतमधील पंप स्टोरेज प्रकल्पावरुन काही नेते, अभिनेते कर्जतला जाऊन पहाणीच्या नावाखाली टुरिझम करत आहेत. नेते, अभिनेते, समाज कार्यकर्ते तिथे जात आहेत.  पर्यावरणाच्या नावाखाली अराजक-2 सुरू झालंय. पर्यावरणावर बोलणं ही एक फॅशन झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंगवर बोलणं ही फॅशन झाली आहे. पर्यावरणाच्या नावाखाली अराजकता पसरवणा-यांना बाह्यशक्तींची मदत, नक्षली मनोवृत्तींना विरोधकही मदतच करत आहेत," असा आरोप साटम यांनी केला.

28 कोटी झाडं लावावी लागतील

"मात्र क्लिन एनर्जी म्हणजे काय याची शिकवणी यांनी लावावी. नेट झीरो म्हणजे काय याचे कॅल्युलेशन कळत नाही. नेते आणि अभिनेत्यांनी याची शिकवणी लावावी. 3000 मेगावॅटच्या थर्मल प्लांट लावला तर होणा-या कार्बन उत्सर्जनाला रोखण्याकरता 28 कोटी झाडं लावावी लागतील, 40 लाख गाड्या रस्त्यावर येतील इतके कार्बन उत्सर्जन होईल. त्यामुळे, पंप स्टोरेज प्लांट महत्वाचा आहे," असं साटम या प्रकल्पाचं समर्थन करताना म्हणाले.

जे बोलतात की सगळे प्रकल्प गुजरातसाठी जातात त्यांना सांगतो...

"टुरिझम करण्याची खाज असेल तर बीडमध्ये जाऊन ही खाज भागवा. कारण मुंबई महापालिकेच्या प्रकल्पातून 2 लाख झाडं बीडमध्ये लावणं अपेक्षित होतं. आदित्य ठाकरेंच्या बुद्धीचं वाळवंट झालं आहे, ते फक्त मोठमोठ्या बाता मारतात. जे बोलतात की सगळे प्रकल्प गुजरातसाठी जातात त्यांना सांगतो सुमन शहा आणि लक्ष्मीकांत शहा गुजरातीच होते आणि रमेश किणी प्रकरणात होते," असा टोला साटम यांनी लगावला. "मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मध्य वैतरणा प्रकल्पाकरता बीडमध्ये 2 लाख झाडं लावण्याची तरतूद होती ती पूर्ण झाली का याची चौकशी करावी आणि कारवाई करावी," असंही साटम यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे पाकीस्तानचा अजेंडा चालवतात

"राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की वीज इतर राज्यांना देणार का? तर प्राधान्यानं महाराष्ट्राला वीज देऊन बाकी वीज आजुबाजूच्या राज्यांना दिली जाणार- पाकीस्तानला वीज जाणार नाही," असा टोला अमित साटम यांनी लगावतानाच, "राज ठाकरे पाकीस्तानचा अजेंडा चालवतात," असं विधान केलं.

साईड अॅक्टर आणि मिमीक्री आर्टीस्टचे डायलॉग

राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आल्यासंदर्भात बोलताना, "एखाद्या कलाक्षेत्राचा कार्यक्रमासाठी पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यात राजकीय काही नव्हतं," असं स्पष्टीकरण साटम यांनी दिलं. तसेच, "2019 पर्यंत मुख्यमंत्र्यांनी कायमच उद्धव ठाकरेंचा मानसन्मान राखला.मात्र डावीकडे गेल्यामुळे त्यांची ही अवस्था झाली. 2029 पर्यंत फडणवीसांना मुख्यमंत्री ठेवा असं राज ठाकरे म्हणाले पण सिनेमात साईड अॅक्टर आणि मिमीक्री आर्टीस्टचे डायलॉग सीरीयस घ्यायचे नसतात," असा टोला साटम यांनी लगावला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES