मुंबईत आणखी एक कोस्टल रोड उभारण्यात येतोय. या सागरी किनारी रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. सुरुवातीला या प्रकल्पाच्या मार्गात एक मोठा अडथळा निर्माण झाला होता. गोरेगावयेथील वीर सावरकर उड्डाणपूल अडथळा ठरत होता. त्यामुळं तो पूल पाडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गासाठी सात वर्षांपूर्वीच 27 कोटी रुपये खर्चून हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता. मात्र आता हा अडथळा आता दूर झाला आहे. मात्र विद्यमान वीर सावरकर उड्डाणपूल न पाडता त्याच्या वरून नवीन उन्नत पूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वर्सोवा-दहिसर या महाप्रकल्पाच्या आड नेणारा मोठा अडथळा दूर झाला आहे.
मुंबई महापालिकेने सागरी किनारा मार्गाच्या उत्तर मुंबईतील भागाचे काम सुरू केले आहे. हा मार्ग वर्सोवा दहिसर आणि पुढे भाईंदरपर्यंत जाणार आहे. या सागरी किनारा मार्गामध्ये गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपुल अडथळा ठरू लागल्यामुळे हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन द्विस्तरीय पूल उभारण्याचा पर्याय मुंबई महापालिका प्रशासनाने निश्चित केला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हा उड्डाणपूल न पाडता प्रकल्प पुढे कसा नेता येईल यावर गेल्या वर्षभरापासून खल सुरू होते. अखेर यावर उत्तर सापडले आहे.
वीर सावरकर उड्डाणपुल जुना पूल न पाडत त्यावरून उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यामुळे उत्तर मुंबई सागरी किनारा मार्गाच्या कामाला वेग येणार आहे. तसेच या उन्नत पुलामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक किनारा रस्त्याशी जोडणे शक्य होणार आहे. गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल एमटीएनएल उड्डाणपूल नावानेही ओळखला जातो. या पुलाचे उद्घाटन 2018 मध्ये करण्यात आले होते. वीर सावरकर पुलाच्या वरून वर्सोवा दहिसर प्रकल्पाची रेषा जात आहे.
वर्सोवा-दहिसर किनारी रस्ता गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यालाही जोडला जाणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले. या उडाणपुलाला मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या कलेक्टरद्वारे जेडण्यात येणार आहे. त्यामुळे वर्सोवा येथून बेट मुलुंड, ठाण्यापर्यंत जाता येणार आहे.