• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /...म्हणून मुंबईतील नगरसेवकांना हवी 300% सॅलरी Hike; मागणी मान्य झाल्यास नेमका किती होणार मासिक पगार? निवृत्तनंतर पेन्शन देण्याचीही मागणी

...म्हणून मुंबईतील नगरसेवकांना हवी 300% सॅलरी Hike; मागणी मान्य झाल्यास नेमका किती होणार मासिक पगार? निवृत्तनंतर पेन्शन देण्याचीही मागणी

महाराष्ट्रात नगरसेवकांना तांत्रिकदृष्ट्या लोकप्रतिनिधी म्हणून मासिक मानधन दिले जाते. हे मानधन महानगरपालिकांच्या वर्गवारीनुसार निश्चत केले जाते. महापालिकांच्या अ प्लस, अ, ब, क, ड अशा श्रेणी आहेत.

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 13, 2026, 08:10 AM IST|Updated: Oct 13, 2026, 08:45 AM IST
joinshare
...म्हणून मुंबईतील नगरसेवकांना हवी 300% सॅलरी Hike; मागणी मान्य झाल्यास नेमका किती होणार मासिक पगार? निवृत्तनंतर पेन्शन देण्याचीही मागणी
Image Credit: नगरसेवकांनी केली मागणी (प्रातिनिधिक फोटो सौजन्य सोशल मीडिया आणि वृत्तसंस्थांकडून साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना सध्या मिळणाऱ्या 25 हजार रुपयांच्या मानधनात वाढ करून ते एक लाख रुपये करण्यात यावे या मागणीचा नगरसेवकांनी पुनरुच्चार केला आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका दीपमाला बढे यांनी ही मागणी केली असून यापूर्वी समाजवादी पक्षाच्या एका नगरसेविकेनेदेखील ही मागणी केली होती. माजी नगरसेवकांसाठी निवृत्तीवेतन (पेन्शन) योजना लागू करण्यात यावी अशीही मागणी बढे यांनी केली आहे.

मागणी नगरसेवकांनी लावून धरली

पालिकेसह राज्यातील अ दर्जाच्या महापालिकांच्या नगरसेवकांना दरमहा 25 हजार रुपये मानधन मिळते. तर ब आणि क श्रेणीतील नगरसेवकांना 10 ते 15 हजार रुपये मानधन मिळते. तर मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना बेस्टचा बसप्रवासही मोफत मिळतो. तसेच तब्बल 1 कोटीचा नगरसेवक निधी आणि प्रभागातील कामे करण्यासाठी 60 लाखांचा निधी मिळतो. मात्र नगरसेवकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांनी लावून धरली आहे. 

कशासाठी हवी आहे वेतनवाढ?

शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या भांडूपमधील नगरसेविका दीपमाला बडे यांनी याबाबतची ठरावाची सूचना मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामे कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी, सध्या देण्यात येणारे प्रतिमाह 25 हजार इतक्या मानधनाऐवजी एक लाख प्रतिमाह इतके मानधन देण्यात यावे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांसाठी निवृत्तीवेतन (पेन्शन) योजना लागू करण्यात यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. म्हणजेच, 25 हजारांवरुन 1 लाख मानधन करण्याची मागणी ही 300 टक्के मानधन वाढवून देण्याची आहे.

227 नगरसेवकांच्या मानधनाचा खर्च किती येईल?

मुंबई महापालिकेचे 227 नगरसेवक असून 10 नामनिर्देशित नगरसेवक आहेत. या नगरसेवकांना दर महा एक लाखाचे मानधन दिल्यास त्याचा खर्च दरमहा 2 कोटी 37 लाखांवर जाणार आहे. तर हाच खर्च वार्षिक 28 कोटीवर जाणार आहे. माजी नगरसेवकांना निवृत्तीवेतन देण्याची मागणी केल्यास त्याचा मोठा ताण पालिकेच्या तिजोरीवर येणार आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या या मागणीवर प्रशासन काय उत्तर देते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कोणत्या महापालिकांमध्ये किती मानधन मिळते?

महाराष्ट्रात नगरसेवकांना तांत्रिकदृष्ट्या 'पगार' मिळत नाही. त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून मासिक मानधन दिले जाते. हे मानधन महानगरपालिकांच्या वर्गवारीनुसार निश्चत केले जाते. महापालिकांच्या अ प्लस, अ, ब, क, ड अशा श्रेणी आहेत. मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका आहे जी अ प्लस श्रेणीत येते. मुंबईतील नगरसेवकांना दरमहा ₹25 हजार मानधन मिळते. 'अ' श्रेणीमध्ये पुणे आणि नागपुरचा समावेश होतो. येथील नगरसेवकांना दरमहा ₹20 हजार मानधन दिले जाते.

'ब' श्रेणीत ठाणे, नाशिक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांचा समावेश होतो. येथील नगरसेवकांना दरमहा ₹15 हजार रुपये मानधन मिळते. 'क' श्रेणीअंतर्गत नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आणि छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका असून येथील नगरसेवकांना दरमहा ₹10 हजार मानधन मिळते. 'ड' श्रेणीत इतर उर्वरित लहान महानगरपालिकांचा समावेश आहे. 'ड' श्रेणीतील नगरसेवकांना दरमहा ₹7500 मानधन दिले जाते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Mumbai News