SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मुंबईतील रेल्वे स्टेशनवर वाजवली छट पुजेची भोजपुरी गाणी! लोकलच्या Announcements 2 तास थांबवल्या; जाब विचारला असता म्हणाले, 'आम्हाला वरुन...'

मुंबईमधील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असली तरी अजून तीन दिवस म्हणजेच छटपुजेपर्यंत ही गाणी वाजवण्याचे वरुन आदेश असल्याचं स्टेशन मास्तरांनी म्हटलं आहे.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 12, 2026, 09:23 IST | Updated: Nov 12, 2026, 12:03 IST
Image Credit: सोशल मीडियावरुन अनेकांची नाराजी
Join

मध्य रेल्वे तसेच हार्बर रेल्वेच्या स्थानकांवर बुधवारी भाऊबीजेच्या दिवशी चक्क भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठी सण साजरा केला जात असतानाच दुसरीकडे रेल्वे प्रशानसाने उद्घोषणा बंद ठेऊन चक्क भोजपुरी गाणी वाजवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनेक स्थानकांवर हा प्रकार पाहायला मिळाला असून यावर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच महाराष्ट्र, नवनिर्माण सेनेनं आक्षेप घेतला आहे. सानपाडा, वडाळा आणि आंबिवली स्थानकांवर हा प्रकार पाहायला मिळाला.

स्थानिक नगरसेविकेने घेतला आक्षेप

वडाळा रेल्वे स्थानकावर छठपूजेच्या पार्श्वभूमीवर नियमित रेल्वे उद्घोषणा बंद करून मोठ्या आवाजात छठपूजेची गाणी वाजवली जात असल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तेथील ठाकरे गटाच्या नगरसेविका माधुरी मांजरेकर यांनी आक्षेप घेत तेथील स्टेशन मास्तरांची भेट घेतली आणि जाब विचारला.  रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांचे आगमन-प्रस्थान आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी उद्घोषणा असतात. मात्र, धार्मिक गाणी वाजवण्यासाठी या उद्घोषणा थांबवणे योग्य आहे का, असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित केला जात आहे.

रेल्वेच्या घोषणा बंद करुन वाजवली गाणी

मध्य रेल्वेच्या मार्गावर मुंबईची लाइफलाइन असलेल्या ट्रेन दर दोन मिनिटाला सुटते. यासंदर्भातील उद्घोषणा रेल्वे स्थानकांवर होते. मात्र या उद्घोषणा दोन तास बंद ठेवून छट पुजेसंदर्भातील गाणी वाजवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक प्रवाशांनी समाजमाध्यमांवर आक्षेप नोंदवला आहे. माधुरी मांजरेकरांनी थेट स्टेशन मास्तरांची गाठ घेऊन विचारणा केली असता वरुन आदेश असल्याचं सांगितलं. लोकल कधी येते याबद्दल मराठी, हिंदी आणि इंग्रजीत होणाऱ्या घोषणा थांबवण्यात आल्या होत्या. पुढील तीन दिवस अशी गाणी वाजवण्यास आम्हाला सांगितल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता यासंदर्भात आक्षेप नोंदवला जात आहे. छट पुजेची गाणी वाजवली जात होती तर काल भाऊबीज होती त्याची गाणी का वाजवली गेली नाही अशी विचारणाही सोशल मीडियावरुन केली जात आहे. धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली रेल्वे स्थानकांचा वापर करण्यावरही नाराजी व्यक्त होत आहे.

भाजपाने कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र?

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या प्रकारावरुन कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. "हे आपल्या महाराष्ट्रासाठी दुर्देवी आहे. या लोकांनी 2022 ला बाळासाहेबांचे विचार घेऊन दुकाना मांडलंय त्यांनी आता कानात रुई घातली आहे. भाजपा कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र असे विचारायचे ते आता विचारायचे पण नाही. महाराष्ट्र उत्तर प्रदेश, बिहारच्या पुढे नेऊन ठेवला. आपण युपी, बिहारची गाणी ऐकली पाहिजे ती सुद्धा भसाड्या आवाजात. अजूनही मराठी, गुजराती, मरावाडी माणसांना कळत नाहीये. जातीवाद, धर्मवाद करुन संपूर्ण हिंदुस्तान वेडा करुन टाकणार आहे," अशी टीका पेडणेकरांनी केली.

"वरुन आदेश म्हणजे कुठून? पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांपेक्षा वर कोण असेल? हे निवडून आलेले लोक कसं काय असं करु शकतात? बाबासाहेबांचं संविधान बदलणार असं जे आम्ही म्हणतोय त्याची ही सुरुवात आहे," असं पेडणेकर म्हणाल्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES