मोठी बातमी! अखेर 11 महिन्याची CIDCO च्या घरांची प्रतीक्षा संपली, या तारखेला असणार सोडत
सिडकोच्या डिसेंबर 2025 गृहनिर्माण योजनेअंतर्गत बिगर-EWS प्रवर्गाची सदनिका सोडतीचा मुहूर्त ठरला आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही सोडत रखडलेली होती.
स्वत:चे आणि हक्काचे घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे सिडकोच्या बहुचर्चित 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेंमधील डिसेंबर 2025 गृहनिर्माण योजनेअंतर्गत बिगर-EWS प्रवर्गाची सदनिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. या सदनिका सोडतीचा मुहूर्त अखेर 11 महिन्यांनी संपला आहे. सिडकोकडून डिसेंबर 2025 गृहनिर्माण योजनेअंतर्गत बिगर-EWS प्रवर्गाची सदनिका सोडतीची तारीख जाहीर केली आहे.
सिडकोकडून प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 1.0 अंतर्गत डिसेंबर-2025 मध्ये जाहीर केली होती. यातून गृहनिर्माण योजनेतील बिगर-EWS (Non-EWS) प्रवर्गातील सदनिकांची सोडत जाहीर झाली होती. या सोडतमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील अर्जदारांची सोडत झाली होती. पण अल्प उत्पन्न गटातील (LIG) अर्जदारांसाठीची सोडतवर न्यायालयाने अंतरिम आदेशाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी स्थगित केली होती. त्यानंतर न्यायालयाने यासंदर्भातील दाखल केलेली याचिका फेटाळली होती.
झालं असं होतं की, 'LIG' हा शब्द या योजनेच्या प्रयोजनार्थ 'बिगर-ईडब्ल्यूएस (Non-EWS)' या अर्थाने असावे. योजनेच्या इतर सर्व अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. तेच अटी व शर्ती या योजनांमध्ये लागू राहणार आहे. त्यानुसार, 'बिगर-ईडब्ल्यूएस (Non-EWS)' सदनिकांसाठीची सोडत आता 27 नोव्हेंबर 2026 असणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे सिडकोकडून सांगण्यात आलं की, ज्या अर्जदारांना अर्ज मागे घ्यायचा आहे, त्यांनी जाहिरातीच्या 10 दिवसांच्या आत मागे घ्यायचा आहे. या अर्जदारांनी भरलेली रक्कम कोणतीही कपात न करता पुढील 15 दिवसांच्या आत मिळणार आहे.