अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात प्रसार माध्यमांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला आहे. "जे काही घटना घडली आहे ती अत्यंत निंदनीय अशा प्रकारची घटना आहे. पोलिसांनी तात्काळ या संदर्भातील कारवाई सुरू केली आहे. रात्रीतूनच साधारणपणे जे आरोपी आहेत त्यांचा आयडेंटिफिकेशन करण्यात आले आहे," अशी माहिती फडणवीसांनी दिली. पुढे बोलताना, "त्यांच्या संदर्भातील धागेदोरे पोलिसांना प्राप्त झाले आणि कुठल्याही परिस्थितीत या आरोपींना पोलीस शोधून काढतील, आणि त्यावर कारवाई करतील. एवढेच नाही तर त्यांच्या पाठीशी कोण आहे त्यांनाही शोधून काढण्याचं काम पोलीस करतील," असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या एजन्सींसोबत...
"मागच्या वेळी हे ज्यावेळी या लोकांनी प्रयत्न केला त्यावेळी मुंबई पोलीसानी आरोपी शोधून काढले. त्यांचे जे या ठिकाणी आका होते तेही शोधून काढले. त्यामुळे मी निश्चितपणे सांगतो कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाही आणि मुंबई पोलीस निश्चितपणे आरोपींना शोधून काढतील. पोलिसांना उघडपणे चॅलेंज कोणी देऊ शकत नाही, हे डरपोक लोक आहेत. हे कुठेतरी लपून बसतात आणि तिथून अशा प्रकारच्या वल्गना करतात आणि यांच्यात हिम्मत नाही," असं फडणवीसांनी म्हटलं आहे. "हे भाडे तत्वावर आणलेोल्या लोकांच्या आधारावर ऑपरेट करणारे लोक आहेत, त्यामुळे निश्चितपणे एकच यामध्ये चॅलेंज पोलिसांना येतं की हे महाराष्ट्रातून ऑपरेट करत नाही, महाराष्ट्राच्या बाहेरून आणि देशाच्या बाहेरून ऑपरेट करतात. मात्र केंद्र सरकारच्या एजन्सींसोबत संपर्क साधून त्यांचं नेटवर्क उध्वस्त करण्याचं काम महाराष्ट्र पोलीस करतील," असं फडणवीस म्हणाले.
बिश्नोई टोळीबद्दल काय म्हणाले फडणवीस?
बिश्नोई टोळीचा या साऱ्याशी संबंध असल्यासंदर्भात बोलताना फडणवीसांनी, "पहिली गोष्ट तर अशा कुठल्याही गँगला घाबरण्याचा कारण नाही. या गँग वगैरे ज्या आहेत त्या म्हणजे डरपोक लोकांचं कार्य आहे. हे घाबरट लोक आहेत. हे कुठेतरी लपून बसतात. कंपनी टेशनचा वापर करून धमक्या देत असतात. मी आश्वस्त करू इच्छितो मुंबई पोलीस हे प्रोफेशनल पोलीस आहेत. आजपर्यंत मुंबई पोलिसांनी दाखवून दिलंय की अशाप्रकारचे जे गुन्हेगार असतात त्यांना मुंबई पोलीस जेरबंद करतात त्यामुळे निश्चितपणे यांच्या कार्य होईल. घटना गंभीर आहे या घटनेच्या अनुषंगाने जे जे करण्याचे जे आवश्यकता आहे ते केले जाईल," असं फडणवीस म्हणाले.
टायगरशी फोनवर काय बोलणं झालं?
"आरोपी अजून मायनर म्हणता येणार नाही पण आरोपी कोण आहेत याचे साधारणतः पोलिसांनी आयडेंटिफाय केले आहेत. टायगर श्रॉफ यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. मी टायगर श्रॉफ यांना अश्वस्त केले आहे की त्यांनी कुठलीही चिंता करू नये. ज्यांनी हे केलंय त्यांना आम्ही शोधून काढणार आणि त्यांना पूर्णपणे सुरक्षित ठेवणार. आतापर्यंतची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. फार वेगानं कारवाई चाललेली आहे. पुढची कारवाई पोलीस सांगतील," असं फडणवीस शेवटी म्हटले.