SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टोरंट पॉवर प्रोजेक्टसाठी कर्जतची जागाच का निवडली? CM फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

कोणी जर आम्हाला पटवून दिलं की, यापेक्षा चांगलं तंत्रज्ञान आहे, त्यामुळे अधिक चांगलं आणि पर्यावरणपूरक काम करता येईल. तर तेही सरकार ऐकून गुंतवणूकदारांना सांगण्यास तयार आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 27, 2026, 05:42 PM IST | Updated: Oct 27, 2026, 05:55 PM IST
Image Credit: टोरंट पॉवर प्रोजेक्टसाठी कर्जतची जागाच का निवडली?
Join

कर्जत तालुक्यातील टोरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप विरोधकांसह पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. त्यामुळं प्रकल्पाला वाढता विरोध बघता सरकारसह सत्ताधारी पक्षाचे नेते मैदानात उतरले आहेत. या प्रकल्पासाठी पर्यायी जागेची निवड व्हावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी कर्जतचीच निवड का करण्यात आली हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

कर्जतची जागाच का निवडली?

"पंप स्टोरेज कुठेही करता येत नाही. त्यासाठी ज्या फिजिबल साईट्स शोधण्यात आल्या आहेत. त्यात वेस्टर्न साईट्सच्या जास्त फिजीबल आहेत. केंद्र सरकारनेही पंप स्टोरेज प्रकल्पाला हिरव्या प्रकल्पात गणलं आहे. त्यामुळे पंप स्टोरेजचं आयुषमान पाहतो तेव्हा त्यात ते जास्त पर्यावरणपूरक होतात. त्यात ते जास्त कार्बन सिक्वेस्ट्रेशनचं काम करतात. म्हणून हे ग्रीन प्रकल्प आहे. याचा योग्य अभ्यास केला, समजून घेतलं तर याला होणारा विरोध अनाठायी आणि राजकीय आहे हे लक्षात येईल".

जर आम्हाला कोणी पटवून दिलं तर...

पुढे ते म्हणाले की, "काही लोकांचे काही मुद्दे असू शकतात. ते मुद्दे तसंच ग्रामस्थांचं म्हणणंही ऐकून घेण्यास तयार आहोत. कोणी जर आम्हाला पटवून दिलं की, यापेक्षा चांगलं तंत्रज्ञान आहे, त्यामुळे अधिक चांगलं आणि पर्यावरणपूरक काम करता येईल. तर तेही सरकार ऐकून गुंतवणूकदारांना सांगण्यास तयार आहे. पर्यावरणाच्या हिताच्या प्रकल्पाला आरे कारशेडमध्येही असाच विरोध झाला होता. शेवटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की, जी झाडे तोडली जात आहेत ती त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ते कार्बन सिक्वेस्ट्रेशनचं करेल तेवढं 'मेट्रो 3' 80 दिवसांच्या फेऱ्यात करेल असं सांगत मान्यता दिली होती. तसंच हे आहे, पण ज्यांन राजकारण करायचं आहे ते करत राहतील".

हे ही वाचा - 100 वर्षांसाठी पर्यावरणाची हानी टाळत आहोत; CM फडणवीसांनी टोरंट प्रोजेक्टबद्दल स्पष्टच सांगितलं, '...तर 28 कोटी झाडे लावावी लागतील'

'कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प पर्यावरणपूरक'

"जो पंप स्टोरेज प्रकल्प आहे तो पर्यावरणपूरक आहे. आपल्याकडे सोलर आणि विंड या दोन पॉवर आपण जनरेट करतो. पण या दोन पॉवर आपल्याला 24 तास मिळत नाही. पाच वाजल्यानंतर सोलर मिळत नाही, हवा नसेल तर विंड मिळत नाही. यामुळे ग्रीडवर त्याचा परिणाम होतो. 24*7 तास आपल्याला नवीकरणीय ऊर्जा देता येत नाही. जगात आज सोलर आणि विंड या पॉवरला बॅलेन्स करण्यासाठी आणि ग्रीड स्टॅबिलाइज करुन 24 तास पॉवर देण्यासाठी पंप स्टोरेज ही पद्धत वापरली जाते. पंप स्टोरेजमुळे पीक अवरमध्ये पूर्णपणे शुद्ध, रिन्यूएबल पॉवर कोणतंही प्रदूषण न करता उपलब्ध होत असते," असं ते म्हणाले आहेत.

...तर 28 कोटी झाडं लावावी लागतील

पुढे त्यांनी सांगितलं की, "आपण जर या प्रकल्पाचा विचार केला तर 3 हजार मेगावॅटचा प्रकल्प आहे. 3 हजार मेगावॅट कोळशाची वीज जेव्हा तयार होते त्यावेळी त्या वीजेने जे प्रदूषण तयार होतं ते प्रदूषण कमी करायचं असेल तर 28 कोटी झाडं लागतात. आपण जर पंप स्टोरेजला विरोध केला तर  कोळशाचीच वीज वापरावी लागेल. ती वीज वापरली तर आपण जे प्रदूषण करु त्यासाठी 28 कोटी झाडं लागावी लागतील जे अशक्य आहे. या प्रकल्पात 90 हजार झाडं लावली जात आहेत. जेवढी जागा घेतली त्याच्या दुप्पट जागा वनविभागाला देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त 60 हजार झाडं प्रकल्पाच्या साईटवर लावली जाणार आहेत".

"जे वेगवेगळे बॅटरी स्टोरेज प्रकल्प आहेत, त्यात 25 वर्ष आयुषमान असतं. सर्व बॅटरी चीनमधून आणाव्या लागतात. पंप स्टोरेजचं आयुषमान 80 वर्ष असतं आणि पूर्णपणे हे तंत्रज्ञान भारतात तयार होतं. त्यासाठी चीनची आवश्यकता नाही. हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे. ज्यातून 100 वर्षासाठी पर्यावरणाची हानी टाळत आहोत. आता जी हानी दिसत आहे, त्याहून कितीतरी हजार पट आपण या प्रकल्पातून टाळणार आहोत," असा दावा त्यांनी केला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES