• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /100 वर्षांसाठी पर्यावरणाची हानी टाळत आहोत; CM फडणवीसांनी टोरंट प्रोजेक्टबद्दल स्पष्टच सांगितलं, '...तर 28 कोटी झाडे लावावी लागतील'

100 वर्षांसाठी पर्यावरणाची हानी टाळत आहोत; CM फडणवीसांनी टोरंट प्रोजेक्टबद्दल स्पष्टच सांगितलं, '...तर 28 कोटी झाडे लावावी लागतील'

पुढील 100 वर्ष पर्यावरण हानी टाळण्यासाठी हा प्रकल्प आहे असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोरंट प्रोजेक्टचं समर्थन केलं आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 27, 2026, 04:42 PM IST|Updated: Oct 27, 2026, 05:10 PM IST
joinshare
100 वर्षांसाठी पर्यावरणाची हानी टाळत आहोत; CM फडणवीसांनी टोरंट प्रोजेक्टबद्दल स्पष्टच सांगितलं, '...तर 28 कोटी झाडे लावावी लागतील'
Image Credit: पुढील 100 वर्ष पर्यावरण हानी टाळण्यासाठी टोरंट प्रकल्प, फडणवीसांचा दावा

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

रायगड जिल्ह्यातील कर्जत घनदाट जंगलात टोरंटच्या प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा  प्रकल्पासाठी  मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप होतोय. यामुळे झाडांसोबतच पक्ष्यांचा अधिवास, वन्यजीवांचं अस्तित्व आणि संपूर्ण जंगलाची जैवविविधता धोक्यात येण्याची शक्यताय. परिणामी यावरुन आता राजकीय आरोपांचा वणवा भडकू लागला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंपाठोपाठ या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरेही मैदानात उतरलेत. तर अभिनेते सयादी शिंदेंनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान या विरोधाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. होणारा विरोध अनाठायी आणि राजकीय असल्याची टीका त्यांनी केली आहे.

"कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प पर्यावरण पुरक आहे. जगात आज सोलर आणि विंड यांना बॅलन्स करण्यासाठी पंपस्टोरेज पद्धत वापरली जाते. प्रकल्प विचार केला तर 3 हजार मेगावॅट निर्मित होईल. प्रकल्प झाला नाही तर कोळसा वापरावा लागेल त्यासाठी झाडे तोडावी लागेल. वन विभाग नवीन झाडे लावेल. पुढील 100 वर्ष पर्यावरण हानी टाळण्यासाठी आता प्रकल्प आहे.  अभ्यास न करता प्रकल्प माहिती  न घेता फक्त विरोध केला जात आहे," अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. आरे मेट्रो कारशेडबाबतही असेच वातावरण केले गेले. ज्यांना राजकारण करायचे त्यांना काही बाकी सांगायचं नाही असंही ते म्हणाले आहेत.

"जो पंप स्टोरेज प्रकल्प आहे तो पर्यावरणपूरक आहे. आपल्याकडे सोलर आणि विंड या दोन पॉवर आपण जनरेट करतो. पण या दोन पॉवर आपल्याला 24 तास मिळत नाही. पाच वाजल्यानंतर सोलर मिळत नाही, हवा नसेल तर विंड मिळत नाही. यामुळे ग्रीडवर त्याचा परिणाम होतो. 24*7 तास आपल्याला नवीकरणीय ऊर्जा देता येत नाही. जगात आज सोलर आणि विंड या पॉवरला बॅलेन्स करण्यासाठी आणि ग्रीड स्टॅबिलाइज करुन 24 तास पॉवर देण्यासाठी पंप स्टोरेज ही पद्धत वापरली जाते. पंप स्टोरेजमुळे पीक अवरमध्ये पूर्णपणे शुद्ध, रिन्यूएबल पॉवर कोणतंही प्रदूषण न करता उपलब्ध होत असते," असं ते म्हणाले आहेत.

 

🕓 4.14pm | 27-10-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://t.co/GGuh5Ks6j9

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 27, 2026

 

पुढे त्यांनी सांगितलं की, "आपण जर या प्रकल्पाचा विचार केला तर 3 हजार मेगावॅटचा प्रकल्प आहे. 3 हजार मेगावॅट कोळशाची वीज जेव्हा तयार होते त्यावेळी त्या वीजेने जे प्रदूषण तयार होतं ते प्रदूषण कमी करायचं असेल तर 28 कोटी झाडं लागतात. आपण जर पंप स्टोरेजला विरोध केला तर  कोळशाचीच वीज वापरावी लागेल. ती वीज वापरली तर आपण जे प्रदूषण करु त्यासाठी 28 कोटी झाडं लागावी लागतील जे अशक्य आहे. या प्रकल्पात 90 हजार झाडं लावली जात आहेत. जेवढी जागा घेतली त्याच्या दुप्पट जागा वनविभागाला देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त 60 हजार झाडं प्रकल्पाच्या साईटवर लावली जाणार आहेत".

"जे वेगवेगळे बॅटरी स्टोरेज प्रकल्प आहेत, त्यात 25 वर्ष आयुषमान असतं. सर्व बॅटरी चीनमधून आणाव्या लागतात. पंप स्टोरेजचं आयुषमान 80 वर्ष असतं आणि पूर्णपणे हे तंत्रज्ञान भारतात तयार होतं. त्यासाठी चीनची आवश्यकता नाही. हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे. ज्यातून 100 वर्षासाठी पर्यावरणाची हानी टाळत आहोत. आता जी हानी दिसत आहे, त्याहून कितीतरी हजार पट आपण या प्रकल्पातून टाळणार आहोत," असा दावा त्यांनी केला आहे.

"एखादं धरण बांधताना वनजमीन घ्यावी लागते, तसं हे धरण आहे. वॉटर बॉडी तयार होणार आहे त्यासाठी ही वनजमीन देण्यात आली आहे. एकूणच या ठिकाणी जे काही बोलणं सुरु आहे ते अभ्यास न करता, प्रकल्पाची माहिती न घेता केलं जात असून, पर्यावरणाच्या हिताचा प्रकल्पाला विरोध होत आहे. चीनसारख्या देशाने सोलर आणि विंडचा समतोल साधण्यासाठी आतापर्यंत 60 हजार मेगावॅट पंप स्टोरेजचं काम केलं आणि अजून 1 लाख 60 हजार मेगावॅट 2030 पर्यंत तयार होणर आहे. जवळपास 2 लाख 10 हजार मेगावॅट पंप स्टोरेज ते तयार करत आहेत. भारतातही आपल्याला कोळशापासून, प्रदूषणापासून मुक्ती हवी असेल तर पंप स्टोरेज पर्याय आहे," असं ते म्हणाले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Devendra Fadnavis
Raj Thackeray
Aaditya Thackeray