SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

‘राज ठाकरेंना रात्रभर...’, दादर स्टेशन नमाकरणावरुन 'मनसे जातीवादी पक्ष' म्हणत हल्लाबोल! 'हिंमत कशी..', 'हा देश बाबासाहेबांनी...'

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादरचं नाव बदलण्यासंदर्भातील भूमिका मांडल्यानंतर संताप व्यक्त करत मनसे नेत्याने या मागणीला विरोध केल्यानंतर या प्रकरणावरुन थेट राज यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 19, 2026, 09:23 IST | Updated: Nov 19, 2026, 11:29 IST
Image Credit: नामकरणावरून नवीन वादाची ठिणगी (प्रातिनिधिक फोटो)
Join

दादर रेल्वे स्थानकाला 'चैत्यभूमी' हे नाव देण्याच्या मागणीला विरोध करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी उघडपणे विरोध केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्थकांनी संताप व्यक्त केला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी किल्लेदार यांची राज ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. सचिन खरात यांनी एख व्हिडीओ जारी करत किल्लेदार यांच्यावर निशाणा साधला आहे. 

किल्लेदार यांच्या पाठीमागे कोण

"फडणवीस यांनी काल दादर रेल्वे स्थानकाचं नाव 'चैत्यभूमी' असं करणार असल्याची ऐतिहासिक घोषणा केली. मात्र या घोषणेमुळे मनसेचे नेते तसेच दादर येथील नगरसेवक यशवंत किल्लेदार यांचं पित्त उसळलं. आम्हाला माहितीये यशवंत किल्लेदार यांच्या पाठीमागे कोण आहे," असं म्हणत सचिन खरात यांनी पुढे राज यांच्यावरच निशाणा साधला आहे. 

पोस्टला तुमचं समर्थन आहे की नाही?

"15 वर्षांपूर्वी आंबेडकरी समाज यासाठी तीव्र आंदोलन करत होता त्यावेळी राज ठाकरे यांनी या मागणीला जाहीरपणे विरोध केला होता. आम्हाला सांगितलं आहे बाबासाहेबांनी, जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. आम्हाला वाटलच की राज ठाकरेंना रात्रभर झोप लागणार नाही. तसेच झाले आहे. बाहेरच्या लोकांनी जी मागणी केली ती दादरकरांवर थोपवत हे नाव बदलण्याचं सुरु आहे. तीव्र निषेध असं लिहिलं आहे यशवंत किल्लेदार यांनी आपल्या पोस्टमध्ये. त्यांनी फेसबुक पोस्टमधून बाबासाहेबांच्या नावाला विरोध केला आहे. मनसे हा पक्ष जातीवादी आहे आम्हाला माहिती आहे. पण राज ठाकरेंना यांना मी मागणी करत आहे की किल्लेदारांच्या पोस्टला तुमचं समर्थन आहे की नाही हे जाहीरपणे सांगावं," अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.

नक्की वाचा >>
'भाजपला खाजच असेल, बाबासाहेबांबद्दल आदर असेल तर...', शिंदेंच्या उपनेत्याचा हल्लाबोल; दादरचं नाव 'चैत्यभूमी' करण्यावरून महायुतीतच मतभेद! 'बाळासाहेबांनी हा डाव हाणून...'

यशवंत किल्लेदारला पाकिस्तानला पाठवा

"याने (किल्लेदार यांनी) जो बाहेरचे लोक असा उल्लेख केला आहे त्याला सांगतो, संविधानिर्मातने महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास वाचला. आम्ही या देशाचे मूळ निवासी आहेत. त्यामुळे बाहेरून कोण आले हे सर्वश्रूत आहे. दादारमध्ये, या भागामध्ये कोण किती लोक राहतात, सर्व जातीधर्माचे लोक राहतात. बाहेरचे लोक कोणाला म्हणता? अरे लाज वाटली पाहिजे. हिंमत कशी केली? हा देश बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालतो. या देशात राहायचं असले तर बाबासाहेबांना मानाव लागेल. संविधानानुसार रहावं लागेल. तुम्ही हिंमत कशी करता बाबासाहेबांच्या नावाला विरोध करण्याची? मी मागणी करत आहे, राज ठाकरेजी यशवंत किल्लेदारांना पक्षातून तातडीने हटवा. राज्य सरकारकडे मागणी करतो की या यशवंत किल्लेदारला पाकिस्तानला पाठवा," असं सचिन खरात म्हणाले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES