• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /अटल सेतूवरुन आता ST ही धावणार! दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एसटी बससेवा सुरू

अटल सेतूवरुन आता ST ही धावणार! दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एसटी बससेवा सुरू

मुंबईहून नवी मुंबई गाठताना जर तुम्ही एसटीने प्रवास करणार असाल, तर आता अटल सेतूवरुन सुसाट जाऊ शकता.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 06, 2026, 06:46 PM IST|Updated: Oct 06, 2026, 06:54 PM IST
joinshare
अटल सेतूवरुन आता ST ही धावणार! दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एसटी बससेवा सुरू

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवा 7 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते या विमानतळ बससेवेचा प्रारंभ होणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. विमानतळ उभारणीइतकेच महत्त्वाचे म्हणजे त्याला मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोकण तसेच राज्याच्या विविध भागांशी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जोडणे होय. या पार्श्वभूमीवर एसटीची दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवा प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याबरोबरच बोरिवली ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्वारगेट ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी बससेवा देखील सुरू होत आहे.

“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी एसटीची विमानतळ बससेवा महत्त्वपूर्ण ठरेल. विमानतळाला एसटीच्या व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळ्याशी जोडल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, विद्यार्थी तसेच विमानप्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह , प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल,” असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

एसटीची ‘लालपरी’ आज राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. या व्यापक जाळ्याचा उपयोग करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवाशांना सहज आणि सुलभपणे पोहोचता यावे, यासाठी एसटी महामंडळाकडून टप्प्याटप्प्याने आवश्यक बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दादर हे मुंबईतील प्रमुख वाहतूक केंद्र असल्याने येथून विमानतळासाठी सुरू होणारी थेट बससेवा प्रवाशांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील विविध भागांतून विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा करण्यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. विमानतळापर्यंतची अखंड आणि सहज सार्वजनिक वाहतूक कनेक्टिव्हिटी ही आधुनिक वाहतूक व्यवस्थेची खरी ओळख आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एसटीचे व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळे यांचा समन्वय महाराष्ट्राच्या विकास प्रवासातील महत्त्वाचा दुवा ठरणार असून, प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार विमानतळ बससेवा देण्याचा एसटी महामंडळाचा संकल्प असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai