• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मुंबईतील सर्वात मोठा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट, 39 मजली 10 इमारती अन् 10,432 घरे, कुठे आहे लोकेशन?

मुंबईतील सर्वात मोठा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट, 39 मजली 10 इमारती अन् 10,432 घरे, कुठे आहे लोकेशन?

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टीचा कायापालय होत आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून 10 इमारती उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन पार पडले.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 13, 2026, 10:06 AM IST|Updated: Oct 13, 2026, 10:09 AM IST
joinshare
मुंबईतील सर्वात मोठा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट, 39 मजली 10 इमारती अन् 10,432 घरे, कुठे आहे लोकेशन?
Image Credit: Mumbai slum redevelopment

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास होत आहे. या प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. धारावीचा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत कायापालट केला जाणार आहे. त्यानुसार आज माटुंगा येथील रेल्वेच्या 22 एकर जागेवर तब्बल गाळे 10,432 पुनर्वसन घरे आणि 1,379 व्यावसायिक, औद्योगिक असलेल्या 10 इमारती उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन पार पडले.

धारावी येथील सेक्टर एक आणि सहामधील पात्र रहिवाशांना माटुंगा येथील घरे प्रथम मिळणार असून, त्यानंतर सुमारे 4,500 सदनिका धारावीतील इतर पात्र रहिवाशांना प्राधान्यक्रमानुसार दिल्या जाणार आहेत. पात्र रहिवाशांना 350 चौरस फुटांची घरे उपलब्ध करुन देणार आहेत.

या 10 इमारती तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्र शासनांतर्गंत येणाऱ्या धारावी पुनर्वसन/झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत. पहिल्या पाच इमारती मार्च 2029 पर्यंत तर त्यानंतरच्या दोन इमारती 2029 पर्यंत व उर्वरित तीन इमारती ऑगस्ट 2030 पर्यंत हस्तांतरित केल्या जाणार आहेत.

10 इमारती या 37 ते 39 मजली असून धारावीतील पात्र रहिवाशांसाठी 10 हजार 232 धरे बांधण्यात येणार आहेत. या इमारतीती घरे 350 चौ फुटांची असतील. तसंच, प्रत्येक इमारतीत 10 ते 12 लिफ्ट असतील. व्यावसायिक, औद्योगिक गाळ्यांसाठी स्वतंत्र्य दोन लिफ्ट असतील. तसंच, सभागृह, बागा, सोसायटी कार्यालय, खेळाचे मैदान, प्रार्थनास्थळे अशा सुविधांचाही येथे समावेश असेल.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये

सिंगापूर-हाँगकाँगमधील अत्याधुनिक आणि नियोजनबद्ध गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास केला जाणार आहे. धारावीकरांसाठी 39 मजल्यांच्या 10 इमारती बांधल्या जाणार आहेत. पात्र रहिवाशांना मिळणाऱ्या नवीन घरांमध्ये स्वतंत्र किचन, बेडरूम, टॉयलेट-वॉशरूम आणि उत्तम नैसर्गिक प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार. प्रकल्प परिसरामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी केली जाणार आहे.

देशातील पहिले ‘मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब’

धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे उभारला जाणारा अत्याधुनिक ट्रान्सपोर्ट हब. ज्यामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा एकत्र केल्या जाणार आहेत. पश्चिम, मध्य आणि हार्बर हे तिन्ही रेल्वे मार्ग आणि विविध मेट्रो मार्ग या हबद्वारे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. भविष्यात बुलेट ट्रेन थेट धारावीपर्यंत आणण्याचा विचार आहे. तसेच हवाई टॅक्सी सेवेसाठी व्हर्टीपोर्ट आणि जलवाहतुकीसाठी फास्ट जेट्टी विकसित केली जाणार आहे. विमान प्रवाशांसाठी धारावीतच सामानाची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जेणेकरून प्रवासी ‘एअरपोर्ट एक्सप्रेस’ने थेट विमानतळावर पोहोचू शकतील.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai News
Infrastructure news
Mumbai