• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मुंबई विमानतळावर सापडलं मोठं घबाड, 3.47 कोटींचे सोनं जप्त, DRI च्या कारवाईची चर्चा

मुंबई विमानतळावर सापडलं मोठं घबाड, 3.47 कोटींचे सोनं जप्त, DRI च्या कारवाईची चर्चा

DRI विभागाने एक मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. काय घडलं नेमकं वाचा

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 22, 2026, 11:54 AM IST|Updated: Oct 22, 2026, 11:55 AM IST
joinshare
मुंबई विमानतळावर सापडलं मोठं घबाड, 3.47 कोटींचे सोनं जप्त, DRI च्या कारवाईची चर्चा
Image Credit: Mumbai Airport Gold Smuggling

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई विमानतळावर DRIने मोठी कारवाई केली आहे. सोन्याची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला. या कारवाईअंतर्गंत 2,317 ग्रॅम म्हणजेच साधारण 2.3 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 3.47 कोटी इतकी आहे. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने (एमझेडयू) मिळवलेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळामार्फत (सीएसएमआयए) चालणाऱ्या एका संघटित सोन्याच्या तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीत दोन प्रवासी, एक विमानतळ कर्मचारी आणि दोन ग्राहक अशा पाच जणांचा समावेश होता.

19-20 ऑक्टोबर 2026 रोजी केलेल्या या कारवाईदरम्यान, डीआरआय अधिकाऱ्यांनी अंदाजे 3.47 कोटी रुपये किमतीच्या 24-कॅरेटच्या 2.317 किलो विदेशी सोन्याच्या विटा जप्त केल्या आणि या तस्करीच्या जाळ्यात सामील असलेल्या पाच जणांना अटक केली.

प्राथमिक तपासात आरोपींचा तस्करीच्या गुप्त हालचाली आणि हाताळणीमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले आहे. सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार हे सोने जप्त करण्यात आले असून, सर्व पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तस्करीच्या टोळीचे व्यापक जाळे शोधण्यासाठी आणि त्यात सामील असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

तपासात समोर आले आहे की, दुबईहून आलेल्या दोन प्रवाशानी एअरपोर्टच्या आतच कस्टमच्या अधिकाऱ्यांना हुलकावणी देत सोनं विमानतळ कर्मचाऱ्याकडे सोपवलं. तसंच, या कर्मचाऱ्याला सोनं टर्मिनल 2 मधून बाहेर काढून तिथे उपस्थित असलेल्या हँडलर्सकडे सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, सरुवातीला तपासात समोर आले आहे की, या रॅकेडचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबईपर्यंत जोडले गेले आहे. त्याव्यतिरिक्त नवी मुंबईतील एक व्यापारीदेखील यात सामील असल्याचे समोर येत आहे.

याव्यतिरिक्त, मुंबई विमानतळावर 19 ऑक्टोबर रोजी झालेल्या एका कारवाईत थायलंडमार्गे सिंगापूरहून आलेल्या एका प्रवाशाला त्याच्या बेल्टमध्ये लपवलेल्या 382 ग्रॅम सोन्यासह अटक करण्यात आली, ज्याची किंमत 55 ते 60 लाख रुपये आहे. तपास यंत्रणा सध्या या सर्व नेटवर्कची आणि त्यांच्याशी संबंधित इतर संशयितांची सखोल चौकशी करत आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai News
Mumbai