• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /याला ‘मदत’ कसे म्हणता येईल? ठाकरेंच्या शिवसेनेचा सरकारला सवाल; ₹5000 ची दुष्काळी मदत ‘ऍडव्हान्स’ म्हणजे काय?

याला ‘मदत’ कसे म्हणता येईल? ठाकरेंच्या शिवसेनेचा सरकारला सवाल; ₹5000 ची दुष्काळी मदत ‘ऍडव्हान्स’ म्हणजे काय?

राज्यातील 300 पेक्षा जास्त तालुके सरकारने दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. या सर्व तालुक्यांतील प्रत्येक शेतकरी जगण्याचा संघर्ष करीत आहे. पुढील सात-आठ महिने बायका-पोरांचे पोट कसे भरायचे, इतर खर्च कसा करायचा, जनावरांना कसे जगवायचे असे असंख्य प्रश्न बळीराजाला भेडसावत आहेत.

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 16, 2026, 06:52 AM IST|Updated: Oct 16, 2026, 07:09 AM IST
joinshare
याला ‘मदत’ कसे म्हणता येईल? ठाकरेंच्या शिवसेनेचा सरकारला सवाल;  ₹5000 ची दुष्काळी मदत ‘ऍडव्हान्स’ म्हणजे काय?
Image Credit: ठाकरेंच्या शिवसेनेनं साधला निशाणा (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जाहीर केलेल्या 5 हजार रुपयांच्या मदतीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेनं टीका केली आहे. "गरीबांच्या जखमांवर मीठ कसे चोळायचे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच शिकावे. दुष्काळाचा वणवा पेटला आहे. माणसे, जनावरांच्या जिवांची होरपळ सुरू आहे आणि सरकार दुष्काळ निवारणावर बैठका आणि घोषणांचा कोरडा पाऊस पाडत आहे. पुन्हा मदतीचा हातभार वितभर आणि त्याची प्रसिद्धी हातभर, असा सर्व प्रकार चालला आहे. फडणवीस यांनी दुष्काळग्रस्तांवर मोठीच मेहेरबानी केली आहे. त्यांचे सरकार म्हणे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजारांची मदत करणार आहे. या भरघोस मदतीचा डांगोरा असा पिटला जात आहे की, लोकांना हा पाच हजारांचा आकडा पाच लाख वाटावा. या पाच हजारांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाची बहार येईल, शेतकरी कुटुंब खूश होईल व त्यांची दिवाळी गोडाची होईल. सवा कोटी शेतकऱ्यांना या पाच हजारी मदतीचा लाभ होईल, असे फडणवीस व त्यांच्या लोकांना वाटत असेल तर त्यांना ग्रामीण महाराष्ट्राच्या उद्ध्वस्त शेतकरी बांधवांची स्थिती माहीत नाही. पाण्याची टंचाई आताच सुरू झाली आहे. महागाईचा भडका पेटला आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. किडुकमिडुक विकून, गहाण ठेवून त्याने पेरणी केली ती जळून गेली. या दुष्काळामुळे त्याच्या खिशाला भोके पडली आहेत. त्यामुळे पाच हजारांची मदत म्हणजे दुष्काळाची चेष्टा व शेतकऱ्यांची थट्टा आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

फक्त घोषणांच्या वाफा

"जीवनावश्यक वस्तूंपासून कपडालत्त्यापर्यंत सर्वच गोष्टींचे भाव रोजच वाढत आहेत. अशा परिस्थितीत सरकारच्या या पाच हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी गोड आणि आनंदी कशी होणार आहे?" असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. "फक्त दिवाळीच्या फराळासाठी लागणारा किराणा माल घ्यायचा म्हटला तरी तो यात (पाच हजार रुपयांमध्ये) येणार नाही. जर शेतकऱ्यांच्या घरात गोडधोड होऊ शकणार नसेल, निदान त्यांच्या मुला-बाळांना तो नवे कपडे घेऊ शकणार नसेल तर हे सरकार कुठल्या तोंडाने ‘शेतकऱ्यांची दिवाळी आनंदी केली होती’ अशी फुशारकी मारीत आहे? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची अवस्था यावेळी कधी नव्हती एवढी दयनीय झाली आहे. राज्यातील 300 पेक्षा जास्त तालुके सरकारने दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. या सर्व तालुक्यांतील प्रत्येक शेतकरी जगण्याचा संघर्ष करीत आहे. खरीप नाही, रब्बी नाही. त्यामुळे पुढील सात-आठ महिने बायका-पोरांचे पोट कसे भरायचे, इतर खर्च कसा करायचा, जनावरांना कसे जगवायचे असे असंख्य प्रश्न बळीराजाला भेडसावत आहेत. त्यांची उत्तरे त्याला सरकारकडून अपेक्षित आहेत. मात्र हे सरकार फक्त घोषणांच्या वाफा सोडत आहे," अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. 

सरकारने आपल्या अकलेचे दिवाळे काढले

"पाच हजार रुपयांची ‘दिवाळी भेट’ जाहीर करून शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याचा आव सरकार आणत आहे. पुन्हा सरकार ज्याला मदत म्हणत आहे तो म्हणे ‘ऍडव्हान्स’ आहे. म्हणजे शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून जी मदत मिळणार आहे, त्यातीलच पाच हजार रुपये आता राज्य सरकारने दिले आहेत. याला ‘मदत’ कसे म्हणता येईल? जे पैसे द्यायचेच आहेत त्यातील एक भाग आधी द्यायचा, त्याला मदतीचा मुलामा द्यायचा आणि आपण केंद्राकडून निधी येण्याची वाट न पाहता बळीराजाची दिवाळी गोड केली म्हणून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. बळीराजाची ही अशी थट्टा तर तिकडे अंगणवाडी सेविका, मदतनीस वगैरेंचीही सरकारने मस्करीच केली आहे. दिवाळी भेट म्हणून त्यांना ‘दोन हजार’ रुपये देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना पाच हजार आणि अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपयांची मदत ‘दिवाळी भेट’ म्हणून जाहीर करून फडणवीस सरकारने आपल्या अकलेचे दिवाळे काढले आहे," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. 

दुष्काळाची चेष्टा

"शेतकऱ्यांना द्यायच्या एकूण पैशांतलाच एक पाच हजारांचा तुकडा ‘ऍडव्हान्स’ म्हणून सरकारने बळीराजाच्या तोंडावर फेकला आहे. देवाभाऊ, आजच्या महागाईच्या वणव्यात दोन-पाच हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी होऊ शकेल? मोदींच्या सेवासंकल्प अभियानासाठी प्रत्येक जिह्याला 50 लाखांचे ‘डबोले’ देणारे हे सरकार शेतकरी आणि अंगणवाडी सेविकांना मात्र दिवाळीसाठी फक्त पाच आणि दोन हजार रुपये देत आहे. ही मदत नाही. त्यांची थट्टा आहे. दुष्काळाची चेष्टा आहे," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Devendra Fadnavis
Uddhav Thackeray