• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला फोन कुणाला केला? तपासाबाबत सर्वात मोठी अपडेट

अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला फोन कुणाला केला? तपासाबाबत सर्वात मोठी अपडेट

मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाला आहे. यात 3 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 18, 2026, 09:03 PM IST|Updated: Oct 18, 2026, 09:16 PM IST
joinshare
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला फोन कुणाला केला? तपासाबाबत सर्वात मोठी अपडेट

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई क्राईम :  बॉलिवूड   अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाला आहे. यामुळे बॉलिवूड हादरले आहे. संध्याकाळच्या वेळेस जुहू परिसरात टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबाराच्या घटनेत तिघेजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. तपासाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.  

मुंबईच्या जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात टायगर श्रॉफवर गोळीबार झाला आहे. अभिनेता टायगर श्रॉफसह तिघे जण जखमी झाले आहेत. यात टायगर श्रॉफसह त्याचा चालक आणि एक रिक्षा चालक देखील जखमी झाला आहे.  टायगर श्रॉफ फुटबॉल खेळून घरी निघाला होता. यावेळी पुष्पा पार्क परिसरात बाईकवरुन आलेल्या 3 अज्ञान इसमांनी टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आहे. मात्र, त्याचा चालक आणि त्याच्या कारच्या बाजूने जाणारा एक रिक्षा चालक जखमी झाला आहे. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

तपासासाठी 15 पथकं तैनात

मुंबई पोलिसांनी या घटनेबाबत माहिती. बाईकवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तीनी गेळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोराचा शोध सुरू आहे. जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली आहे.   टायगर श्रॉफ सुरक्षित आहेत. त्यांना गोळी लागून कोणतीही इजा झालेली नाही. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती डीसीपी मोहित गर्ग यांनी दिली. चालकाच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. आणखी एक व्यक्ती जखमी झाली असून त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपासासाठी 15 पथके तयार करण्यात आली आहेत. चालक परदोश आणि चौहाण जखमी झाले आहेत. 

टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा मुंबई पोलीस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याच्या ठनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मुंबईच्या पोलिस आयुक्तांना फोन केला.  अभिनेता टायगर श्रॉफच्या गोळीबाराच्या घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना बोलावले.  तात्काळ तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले आहेत.

दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई  गँगने टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी  स्विकारली आहे.  लॉरेन्स गँगचे अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत सलमानचे नाव घेत टायगर श्रॉफवर गोळीबार केल्याचे उघडपणे सांगितले आहे. यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Entertainment News
crime