• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'दादर' नावामागचा अर्थ काय? स्टेशनला हे नाव कसं मिळालं? जुन्या मुंबईत हे गावच नव्हतं!

'दादर' नावामागचा अर्थ काय? स्टेशनला हे नाव कसं मिळालं? जुन्या मुंबईत हे गावच नव्हतं!

दादर रेल्वे स्थानकाला नाव कसं मिळालं? या नावामागचं सत्य काय, जाणून घेऊयात.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 19, 2026, 13:32 IST|Updated: Nov 19, 2026, 13:37 IST
joinshare
'दादर' नावामागचा अर्थ काय? स्टेशनला हे नाव कसं मिळालं? जुन्या मुंबईत हे गावच नव्हतं!
Image Credit: How did Dadar station get its name know interesting facts

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्यात येणार आहे. दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली असून, केंद्र शासनाकडून आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधिमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र या घोषणेनंतर नवा वाद उफाळला आहे. अनेक राजकीय पक्षांनी चैत्यभूमी नावाला विरोध केला आहे. पण सध्या एक प्रश्न चर्चेत आहे तो म्हणजे, दादर हे नाव कसं मिळालं? वाचा ही रंजक कथा.

मुंबई ही सात बेटांची आहे. सात बेटं जोडून हे शहर वसवण्यात आलं. तर, 1968 साली दादर रेल्वे स्थानक तयार झालं. पण या स्थानकाला दादर हेच नाव का दिलं गेलं? यामागे प्राचीन मुंबईचा एक रंजक इतिहास आहे. दादर हे मुंबई शहराला जोडणारं  आणि सर्वात गर्दीचं स्थानक आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेचा मध्यबिंदू म्हणून दादर स्थानकाकडे पाहता येतं. तर अशा या दादरला मुंबईकरांच्या हृदयात एक वेगळंच स्थान आहे.

मराठी भाषेत दादर या शब्दाचा अर्थ जिना किंवा शिडी (पायऱ्यांचा मार्ग) असा होतो. यावरुन या रेल्वे स्थानकाला दादर हे नाव मिळालं. उत्तर मुंबईतून (सालसेट आणि माहीम बेटाकडून) दक्षिण मुंबईतील मुख्य बेट-शहराकडे जाण्यासाठी हा मधला भाग एखाद्या 'शिडी'सारखा किंवा प्रवेशद्वारासारखा काम करायचा. या बंधाऱ्यावरुन दादर नाव ठेवलं असे म्हटले जाते.

माहिम बेट आणि परळ बेटाला जोडणाऱ्या बंधाऱ्याला दादर असे म्हटले जात होते. दादरमधून जाणाऱ्या दोन रेल्वे ट्रॅकमुळे तेथे दोन भाग निर्माण झाले होते. दोन्ही भाग जोडण्यासाठी आणि लोकांना ये जा करण्यासाठी एक ब्रीज निर्माण करण्यात आला. ब्रीजला मराठीत दादर म्हटले जाते. त्यामुळे त्यास दादर असेही म्हटले गेले.

आणखी एका संदर्भानुसार,  मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी मच्छीमारांनी आपल्या होड्या किनाऱ्यावर आणण्यासाठी आणि खाडीच्या दलदलीतून वर चढण्यासाठी येथे दगडाच्या पायऱ्या बांधल्या होत्या. कोळी समाज या दगडी पायऱ्यांना स्थानिक भाषेत 'दादर' म्हणायचा. पुढे ब्रिटिशांनी जेव्हा या पायऱ्यांजवळ रेल्वे स्थानक उभारले, तेव्हा त्यांनी या स्थानकाला 'दादर' हेच नाव दिले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai Local
Mumbai News
Viral News