SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना; दिल्लीपासून गल्लीपर्यंत मोठं राजकारण पेटले असताना मनसेची मोठी रणनिती

डोंबिवली मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 28, 2026, 23:06 IST | Updated: Nov 28, 2026, 23:10 IST
Join

राज ठाकरे : डिलिमिटेशन विधेयकावरुन देशात दिल्लीपासून गल्लीपर्यंत मोठं राजकारण पेटले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम झाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा जाहीर केल्याने महाविकासआघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांवर निशाणा साधला आहे. यानंतर डोंबिवलीत राज ठाकरेंनी मनसैनिकांना मार्गदर्शन केले.जाती धर्माचं राजकारण करू नका...एकोपा तयार करा, राज ठाकरेंनी मनसैनिकांना कानमंत्र दिला आहे.

SIR प्रक्रियेवर लक्ष दिलं नाही तर जागा वाढवुन काय फायदा अशा प्रकारे डी लिमिटेशन वर एक प्रकारे भाष्य केलं. तसेच निवडणुका नसल्या तरी घराघरात पोहचा, फक्त निवडणुकीच्या वेळेस काम न करता इतर दिवशीही लोकांची कामे करा, त्यांच्या घरी जा,जाती धर्माचं राजकारण करू नका ,एकोपा निर्माण करा अशा प्रकारच्या सूचना त्यांनी मनसैनिकांनी केल्या. 

राम मंदिरात चोरी झाली  त्याचं पुढे काही झालं नाही असेही ते म्हणाले .त्याचबरोबर महिलांना विरंगुळ्यांची कोणत्याही साधन नं नसल्याने त्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहतात ,त्यामुळे पाककला यासारख्या स्पर्धांचं आयोजन करा असं ते म्हणाले. सणांबद्दल बोलताना धार्मिक भावना भडकावण्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट केले जातात, त्याच्यामध्ये काहीही तथ्य नसतं, त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. कारण प्रतिक्रिया दिली तर त्याचा फायदा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत केला जाऊ शकतो, असेही राज ठाकरे म्हणाले. 

आळंदी सारख्या ठिकाणी छटपूजा झाली याचाही उल्लेख राज ठाकरे यांनी त्या बैठकीत केला. राष्ट्रवादी शरद पवार डी लिमिटेशन पाठींबावर पहिली टीम सत्ताधाऱ्यांकडे पाठवली,हळूहळू दुसरी टीम जाईल असं सांगितलं होतं,असं राज ठाकरे म्हणाले.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES