• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'माझ्या शांततेला...'; वडिलांनीच पक्षाच्या वतीने डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यानंतर नताशा आव्हांडाची पोस्ट

'माझ्या शांततेला...'; वडिलांनीच पक्षाच्या वतीने डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यानंतर नताशा आव्हांडाची पोस्ट

जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पक्ष पाठिंबा देत असल्याचं जाहीर केल्यानंतर नताशा आव्हाड यांचं ट्वीट चर्चेत

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 28, 2026, 14:40 IST|Updated: Nov 28, 2026, 14:42 IST
joinshare
'माझ्या शांततेला...'; वडिलांनीच पक्षाच्या वतीने डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यानंतर नताशा आव्हांडाची पोस्ट
Image Credit: Jitendra Awhad daughter Natasha Awhad tweet on delimitation says dont mistake my silence for complicity

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून देशाच्या राजकारणात राजकीय घडामोडींना उत आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा  निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचा हा निर्णय काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला पटलेला नाही. काँग्रेस नेते आणि संजय राऊतांनी उघडपणे पवारांच्या राष्ट्रवादीवर थेट निशाणा साधलाय. तर, पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांनीही पक्षाचा घरचा आहेर देत टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांची लेक नताशा आव्हाड यांनी केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत महत्त्वाचं विधान केलं होतं. चर्चा एकदम क्लिअर आहे, डिलिमिटेशन विधेयकाला समर्थन देण्याचे पक्षाचे ठरले आहे आणि आम्ही त्याला पाठिंबा देणार आहोत, असं अव्हाड यांनी म्हटलं होतं. आव्हाडांच्या या प्रतिक्रियेनंतर  राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.

जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या घोषणेनंतर आता त्यांची लेक नताशा आव्हाड यांचं ट्विट चर्चेत आलं आहे.  माझ्या शांततेला सहमती समजू नका, असं म्हणत बिलाच्या विरोधात भूमिका कायम असल्याचे  ट्वीट त्यांनी केलं आहे. नताशा आव्हाड यांनी शनिवारी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, कृपया माझ्या शांततेला सहमती समजू नका. ज्यांनी ज्यांनी मला टॅग केलंय, त्यांचं म्हणणं मी ऐकतेय, मी समजू शकतेय, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, मी मनापासून माफी मागतेय, असंही त्यांनी म्हटलं आहे.

please don’t mistake my silence for complicity. everyone who has been tagging me- I hear you, i see you. and my sincerest apologies.

— Natasha Awhad (@NatashaASpeaks) November 28, 2026


जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

डिलिमिटेशनची चर्चा सुरू होण्यापूर्वीच शरद पवारांशी झालेल्या एका अनौपचारिक चर्चेचा संदर्भ देत आव्हाड म्हणाले की, "मतदारसंघांची पुनर्रचना (डिलिमिटेशन) ही संविधानिक प्रक्रिया आहे आणि ती आज ना उद्या करावीच लागते. त्याला कोणताही पर्याय नसतो, त्यामुळे आपापले मतदारसंघ बांधायला शिका, असे पवार साहेबांनी मला सांगितले होते.", असं म्हणत  पुढे म्हणाले की, "चर्चा एकदम क्लिअर आहे, डिलिमिटेशन विधेयकाला समर्थन देण्याचे पक्षाचे ठरले आहे आणि आम्ही त्याला पाठिंबा देणार आहोत."

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Jitendra Awhad
Sharad Pawar
Supriya Sule