• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /साहसी पोलिसांच्या पाठीवर फडणवीस सरकार देणार थाप; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय

साहसी पोलिसांच्या पाठीवर फडणवीस सरकार देणार थाप; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 06, 2026, 03:40 PM IST|Updated: Oct 06, 2026, 03:44 PM IST
joinshare
साहसी पोलिसांच्या पाठीवर फडणवीस सरकार देणार थाप; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

साहसी पोलिसांच्या पाठीवर फडणवीस सरकार थाप देणार आहे. साहसी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना "मुख्यमंत्री शौर्य पदक" मिळणार आहे. जोखीम पत्करून केलेल्या कामगिरीसाठी हे प्रोत्साहन दिलं जाणार असून, रोख 50 हजार रुपयांचा पुरस्कार, पदक व प्रशस्तीपत्र दिलं जाणार आहे. निवडीसाठी त्रिस्तरीय विविध समित्यांच्या रचना करण्यात आल्या असून, वर्षभरातील कामगिरीची दखल घेतली जाणार आहे. दरवर्षी महाराष्ट्र दिन 1 मे च्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री शौर्य पदकांची घोषणा होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी इतरही सहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय कोणते आहेत जाणून घ्या.

मंत्रिमंडळ निर्णय


•    पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना साहसी कामगिरीसाठी "मुख्यमंत्री शौर्य पदक" मिळणार. कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून केलेल्या कामगिरीसाठी रोख पन्नास हजार रुपयांचा पुरस्कार, पदक तसेच प्रशस्तीपत्र. निवडीसाठी त्रिस्तरीय विविध समित्यांच्या रचना. वर्षभरातील कामगिरीची दखल घेतली जाणार, यावर्षी १ जानेवारी २०२६ पासूनची कामगिरी गृहीत धरली जाणार. दरवर्षी महाराष्ट्र दिन १ मेच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री शौर्य पदकांची घोषणा होणार. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शौर्य पदक प्रदान होणार. (गृह विभाग).


•    वडार समाजाला मोठा दिलासा. पारंपरिक दगडफोडी व उत्खननातील गौण खनिज स्वामित्वधनासाठी (रॉयल्टी) वाढीव सवलत. वार्षिक उत्खनन मर्यादा दोनशे ब्रास वरून, पाचशे ब्रास करण्यात येणार. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिजांचे उत्खनन व ती काढणे), नियम १९६८ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)


•    शैक्षणिक संस्थांसाठी उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संशोधनासाठी सी.एम. सृष्टी (CM SRISTHI (Scheme for Research, Innovations and Technological Hubs in Higher Education Institutions) योजना राबविण्यास मंजुरी. राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय उच्च व तंत्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतने, रसायन तंत्रज्ञान संस्था -आयसीटी, मुंबई, कॉलेज ऑफ इंजिनियरिंग तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे- रायगड या संस्थांच्या माध्यमातून योजना राबविणार. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

•    पोलीस कोठडीतील मृत्युप्रकरणी नुकसानभरपाई देण्याबाबतच्या धोरणास मंजुरी. पोलीस कोठडीत असताना होणाऱ्या अनैसर्गिक मृत्युच्या बाबतीत मृताच्या कायदेशीर वारसांना वेळेत आर्थिक सहाय्य देण्यासाठी, सर्वसमावेशक असे धोरण. (गृह विभाग)


•    सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थाद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मंजुरी. अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, चौकीदारांच्या मानधनात भरीव वाढ. राज्यातील सुमारे २ हजार ३८८ अनुदानीत वसतीगृहांच्या कर्मचाऱ्यांना दिलासा. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)

•    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्यास मंजुरी. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र पण अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी, बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास व शैक्षणिक सुविधांसाठी मिळणाऱ्या भत्त्यांमध्ये वाढ. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)

•    अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. (आदिवासी विकास विभाग)

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News