• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्राला देणार का ₹40 हजार कोटी? कशासाठी हवाय एवढा पैसा?

केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्राला देणार का ₹40 हजार कोटी? कशासाठी हवाय एवढा पैसा?

महाराष्ट्रातील दृष्काळाचं संकट अधिक गडद झालं असून आता राज्य सरकारला केंद्राकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळेच या महिन्याच्या शेवटी केंद्र सरकारकडे दुष्काळासाठीच्या मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 24, 2026, 02:56 PM IST|Updated: Oct 24, 2026, 02:59 PM IST
joinshare
केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्राला देणार का ₹40 हजार कोटी? कशासाठी हवाय एवढा पैसा?
Image Credit: फोटो प्रातिनिधिक, सौजन्य सोशल मीडिया आणि वृत्तसंस्थांकडून साभार

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्रामध्ये अल्प पर्जन्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून किती रुपये लागणार आहेत याची आकडेवारी समोर आली आहे. अर्थात आतापर्यंत कृषी विभागाबरोबरच राज्य सरकारमधील दुष्काळाशीसंबंधित अन्य विभागाने निधी मागणीचे प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाकडे सादर केलेले नसले तरी एका अंदाजानुसार राज्य सरकार या महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये केंद्राकडे दुष्काळ निवारणासाठी 40 हजार कोटी रुपयांचा निधी मागणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे सादर केला जाणार आहे. 

तातडीने मागणार होते 18 हजार कोटी पण...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहावर केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर आढावा बैठक पार पडली होती. पुढील सात दिवसांमध्ये केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात यावं अशा सूचना बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांनी दिल्या. मात्र ऐनवेळी झालेल्या एका बदलामुळे तेव्हा तयार करण्यात आलेला 18 हजार कोटींच्या तातडीनेच्या मदतीचा प्रस्ताव तयार असूनही तो केंद्राकडे पाठवण्यात आला नाही. राज्य सरकारने फेर आढावा घेत दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या 265 वरुन 39 ने वाढून 304 करण्यात आल्याने हा प्रस्ताव पुढे पाठवला नाही. दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढल्याने अधिक मदत लागेल असं स्पष्ट झाल्याने तातडीच्या मदतीचा तयार प्रस्ताव पुढे पाठवण्यात आला नाही.

राज्य सरकार स्वत: देणार 8 हजार कोटी

राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी दुष्काळामुळे निराश जाऊ देणार नाही असं सांगत दिवाळीपूर्वी दिलासा म्हणून प्रती शेतकरी पाच हजार रुपये आग्रीम निधी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या मदतीसाठी राज्य सरकारला तिजोरीतील 8 हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. राज्य आपत्ती निवारण प्राधिकरण आणि राज्य सरकारच्या स्वःनिधीतून ही रक्कम देण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला. पुढील आठवड्यात म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होऊन मदतीचे वितरण सुरू होणार असल्याचं सांगितलं जातंय.

परत पंचनामे का?

विशेष म्हणजे दुष्काळी तालुक्यांची संख्या वाढल्याने केवळ तातडीचा प्रस्ताव रखडला असं नाही तर फेर पंचनाम्याची वेळही प्रशासनावर आली. 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची पहाणी होणार होती आणि अचानक ती संख्या 304 झाल्याने पुन्हा पंचनामे करावे लागले. प्रत्यक्ष पहाणीनंतर पिकांचं नुकसान किती झालं आहे हे नोंदवण्यात आलं. यामुळे कृषी विभागासहीत इतरही सर्वच विभगांकडून मागणी करण्यात आलेल्या मदत निधीत वाढ झाली. प्रत्येक विभाग आपल्या गरजेनुसार मदत निधी मागणीचा प्रस्ताव मदतआणि पुनवर्सन विभागाला पाठवणार आणि त्यानंतर हे सर्व प्रस्ताव तसेच आकडेवारी एकत्र करुन केंद्राकडे मदतीचा अंतिम प्रस्ताव पाठवला जाईल. ही रक्कम 40 हजार कोटी रुपयांच्या घरात जाईल असा अंदाज तरी सध्या मदत आणि पुनर्वसन विभागाकडून व्यक्त केला जातोय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News