• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /शरद पवारांच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय प्रयोगाचा शेवट? कोणत्याही क्षणी मोठा राजकीय भूकंप होणार

शरद पवारांच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय प्रयोगाचा शेवट? कोणत्याही क्षणी मोठा राजकीय भूकंप होणार

सर्वात मोठा पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशी चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 28, 2026, 22:06 IST|Updated: Nov 28, 2026, 22:14 IST
joinshare
शरद पवारांच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय प्रयोगाचा शेवट? कोणत्याही क्षणी मोठा राजकीय भूकंप होणार

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन पाठींबा जाहीर केल्याने महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम होणार आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महाराष्ट्रात विरोधात असलेल्या महविकासआघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे. शरद पवारांनी NDA ला पाठिंबा जाहीर केल्याने महाविकासआघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.  यामुळे माहविकास आघाडीच्या अस्तित्वाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकावरून महाविकास आघाडी राहणार की नाही याबाबत आता उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. कारण या विधेयकाला पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी SPचा निर्णय काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला पटलेला नाही. काँग्रेस नेते आणि संजय राऊतांनी उघडपणे पवारांच्या राष्ट्रवादीवर थेट निशाणा साधला आहे. 

काँग्रेसनं तर सगळी उणीधुणी काढलीत. त्यामुळे भाजपच्या धोरणांना विरोध करण्यासाठी शरद पवार आणि संजय राऊतांच्या पुढाकारातून उदयास आलेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग संपुष्टात येणार अशीच चिन्हं दिसत आहेत. या फुटीची औपचारिकता शिल्लक राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.. पोपट मेलाय, मात्र सांगणार कोण हेच आता बाकी राहिली. दरम्यान टीकेनंतर सोमवारपर्यंत शरद पवारांची भूमिका बदलणार का याचीही उत्सुकता लागली आहे. 

डिलिमिटेशनवरुन अंबादास दानवेंचा राष्ट्रवादी SPवर प्रहार 

डिलिमिटेशनवरुन अंबादास दानवेंचा राष्ट्रवादी SPवर प्रहार केला आहे. पक्ष चिन्हात तुतारीऐवजी कमळाचा फोटो टाकत घणाघात केला आहे.  तुतारी चिन्हामध्ये कमळाचा फोटो पोस्ट केला आहे. 

महाविकास आघाडीत ढकलून स्वत: पळून गेले; UBTनेते चंद्रकांत खैरे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर संताप

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांच्या पक्षानं पाठिंबा दिल्यानं शिवसेना UBTनेते चंद्रकांत खैरे यांनी संताप व्यक्त केलाय. शरद पवारांनी आम्हाला धोका दिला. पवारांच्या मागे जाऊन आम्ही आमचं नुकसान केलंय, असा संताप खैरेंनी व्यक्त केलाय. तसंच आम्हाला महाविकास आघाडीत ढकलून स्वत: पळून गेले, त्यांच्यासोबत राहून काय मिळाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीतील सध्याच्या राजकीय घडामोडींवरून ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा संताप अनावर झाला आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत, ‘त्यांच्या मागे जाऊन आम्ही आमचे नुकसान करून घेतले. आम्हाला महाविकास आघाडीत ढकलून तेच निघून गेले,’ अशा शब्दांत खैरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) वर जोरदार टीका केली. पवारांनी आम्हाला धोका दिला असून, त्यांच्यासोबत राहून काय मिळाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शरद पवार भाजपसोबत जातील, मात्र आम्ही तिथेच राहू, असे अनेक नेते पूर्वी सांगत होते. प्रत्यक्षात सत्ताही मिळाली नाही आणि राजकीयदृष्ट्याही नुकसान झाले, अशी खंत खैरेंनी व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे,’ अशी टीका केली. 

शरद पवारांच्या राजकीय इतिहासाचा उल्लेख करत खैरे म्हणाले, ‘वसंतदादांपासून आम्हाला शरद पवारांची हिस्ट्री माहिती आहे. ते बाळासाहेबांचे मित्र होते. त्यांनी आम्हाला एकत्र आणले आणि स्वतःच निघून गेले.’ शरद पवारांना आपण बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मानतो, असे सांगतानाच त्यांच्या या भूमिकेमुळे दुःख झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.खैरेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजी आणि राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

खासदारांची संख्या 850 करा किंवा 1 हजार करा... राममंदिर लुटणा-यांना जनता स्वीकारणार नाही...  आदित्य ठाकरेंची टीका... शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा डिलिमिटेशन विधेयकाला विरोध.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Sharad Pawar