SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अखेर महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल! नोव्हेंबरच्या 'या' तारखेपर्यंत गारठा वाढणार

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात थंडीचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झाली.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 13, 2026, 08:19 IST | Updated: Nov 13, 2026, 08:25 IST
Image Credit: maharashtra weather update
Join

महाराष्ट्रातील अनेक भागांत हवेत गारठा वाढला आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. मराठवाडा, विदर्भ उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत थंडीचा जोर वाढू लागला आहे. पहाटेच्या वेळी गारवा जाणवण्यास सुरूवात झाली आहे.

हवामान विभागाच्या 12 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीसाठीच्या अंदाजानुसार, पुढील दोन आठवडे तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात वाढ होऊ शकते. त्यामुळं नोव्हेंबरच्या उत्तरार्धात आणि डिसेंबरच्या सुरुवातीला थंडीचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.

12 नोव्हेंबर रोजी नोंद झालेल्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. अनेक शहरांत किमान तापमान 10 ते 14 अंश अशी नोंद झाली आहे. ऑक्टोबरमधील उष्ण हवामानातून नोव्हेंबरमध्ये थंडीच्या हंगामाकडे होणारा हा संक्रमणाचा काळ आहे. त्यामुळे या काळात तापमानात चढ-उतार दिसून येतात.

छत्रपती संभाजी नगर शहरातील किमान तापमानात सातत्याने घट होत  आहे. गेल्या पाच दिवसांपासून खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात झाली आहे. गुरुवारी  शहराचे किमान तापमान 17.2 अंश सेल्सिअसवर घसरले. सध्या सूर्याचे दक्षिणायन सुरू असून या कालावधीत सूर्यकिरणे बदलत असल्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. येत्या रविवारपासून किमान तापमान 15 अंशापर्यंत घसरण्याची शक्यता असून शहरात थंडीत वाढ होईल.

कसे असेल हवामान

13 ते 19 नोव्हेंबर : महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता.

20 ते 26 नोव्हेंबर: महाराष्ट्रासह बहुतांश भागात तापमान सरासरीच्या आसपास किंवा खाली राहील.

27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर: देशाच्या दक्षिण व मध्य पट्टात थंडीचा प्रभाव कायम राहील.

4 ते 10 डिसेंबर : काही आठवडे महाराष्ट्रासह मध्य भारतात सुखद आणि आल्हाददायक वातावरणासह थंडीचा प्रभाव.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES