SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार; नोव्हेंबरमध्येच गाठला उच्चांक तापमानाचा पारा, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता हे हवामान निवळल्यानंतर पुन्हा उन्हाचा चटका वाढणार आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 06, 2026, 08:06 AM IST | Updated: Nov 06, 2026, 08:08 AM IST
Image Credit: Maharashtra Weather update
Join

बंगालच्या उपसागरात तयार झालेले मुरासू चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्यात पाऊस थांबला आहे. पाऊस थांबताच पुन्हा एकदा हवामानात बदल झाले आहेत. राज्यात पुन्हा एकदा उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. आज राज्यात ढगाळ हवामान असून तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

मुरासू चक्रीवादळानंतर राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता चक्रीवादळाची स्थिती निवळल्यानंतर राज्यात पुन्हा उकाडा वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळं ऐन दिवाळीत नागरिकांना उन्हाचे चटके बसत आहेत. मुंबईतील कुलाबा येथे राज्यातील उच्चांकी 36.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिकसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात 6 नोव्हेंबर रोजी कोरडे हवामान राहणार आहे. रायगड आणि रत्नागिरीत जिल्ह्यातही कोरडे हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं आज राज्यात कुठेच पावसाची चिन्हे नाहीत.

दिवाळी सुरू झाली तरी अद्याप राज्यात थंडीची चाहुल लागली नाहीये. एकीकडे राज्यातील काही भागात उन्हाचा चटका वाढतोय. तर, काही ठिकाणी पहाटे गारवा जाणवतोय. तर दुपारी उन्हाच्या झळांनी हैराण व्हायला होते. गुरुवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निच्चांकी 15.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राच्या तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानाचा पारा 35 अंशांच्या पुढे गेला आहे.

नोव्हेंबरमध्ये उन्हाची काहिली

नोव्हेंबर महिन्यातही उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.  महाराष्ट्रासह देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. प्रशांत महासागरातील 'एल निनो' स्थितीची तीव्रता आगामी काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम देशातील तापमानावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नोव्हेंबरही तापदायक जाणार आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES