SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ST महामंडळात ड्रायव्हर, कंडक्टरसह 13980 पदांची बंपर भरती; कंत्राटी पद्धतीने नोकरी भरती

मंत्रालयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचारी भरतीला मान्यता देण्यात आली. 13980 पदांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 13, 2026, 20:25 IST | Updated: Nov 13, 2026, 20:26 IST
Join

एसटी महामंडळ : एसटी महामंडळात लवकरच सुमारे 13 हजार 980 पदांची भरती होणार आहे.  चालक, वाहकयासह यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि नियमानुसार पार पडावी. बाह्य संस्थेमार्फत करण्यात येणारी उमेदवारांची निवड एसटी महामंडळाने निर्धारित केलेल्या पात्रता निकषांनुसारच व्हावी, याची संबंधित संस्थेने आणि एसटी प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच या प्रक्रियेत कोणत्याही उमेदवाराची फसवणूक होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी एसटी प्रशासनाने घ्यावी, असे स्पष्ट निर्देश या बैठकीत दिले. 

दरम्यान, एसटी महामंडळाच्या नावाचा गैरवापर करून काही खासगी संस्था गरजू व बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत त्यांच्याकडून अवैधरित्या पैसे उकळत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. अशा प्रकारांमुळे नोकरीच्या आशेने असलेल्या तरुणांची आर्थिक फसवणूक होत असून, त्याचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या प्रतिमेवर होत आहे. काही समाजकंटकांच्या गैरकृत्यांमुळे महामंडळाची जनमानसातील प्रतिमा मलीन होणे ही गंभीर बाब आहे. 

या पार्श्वभूमीवर, एसटी महामंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर प्रकारांची सुरक्षा व दक्षता विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. उमेदवारांची फसवणूक करणाऱ्या संस्था व संबंधित व्यक्तींची ओळख पटवून दोषींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करावेत, असे निर्देशही यावेळी दिले.

भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची आर्थिक लूट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. भरती प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि उमेदवारांच्या हिताचे रक्षण यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES