SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

राष्ट्रवादीच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? वाढत्या गाठीभेटी जुळणार नव्या गाठी?

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना आज खासदार पार्थ पवार यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतलीय. आज सलग दुस-या दिवशी भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 08, 2026, 23:46 IST | Updated: Nov 08, 2026, 23:54 IST
Join

शरद पवार : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच पवार कुटुंबातील भेटीगाठी वाढल्यात. खासदार पार्थ पवार यांनी सलग दुसऱ्या दिवशी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. तब्बल अडीच तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटींचा राजकीय अर्थ काढला जात असतानाच नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? 
 

राजकारणात काही भेटी केवळ सदिच्छा भेटी असतात. तर काही भेटींच्या निमित्ताने नव्या राजकीय चर्चांना सुरुवात होते. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच पवार कुटुंबातील भेटीगाठी वाढल्यात आहेत.  खासदार पार्थ पवार यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सिल्व्हर ओकवर हजेरी लावली. शरद पवारांची भेट घेत त्यांनी तब्बल अडीच तास चर्चा केली. 7 नोव्हेंबर रोजी शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यामुळे पार्थ पवारांनी काल त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. मात्र आज पुन्हा झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. 

दरम्यान या भेटीगाठींवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झालेत. आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर तटकरेंनी राजकारण सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच शरद पवारांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. तर पवारांची राष्ट्रवादी NDAसोबत जाणार नाही अशा विश्वास खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला.

वाढत्या गाठीभेटी जुळणार नव्या गाठी?

दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनीही विलीनीकरणाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. विलीनीकरणाच्या चर्चा रुग्णालयात करणार का? असा सवाल त्यांनी केला. शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यास भेट घेतल्याचे पटेल म्हणाले. 

मात्र या सगळ्या घडामोडींवर मित्रपक्षातील राजकीय नेत्यांचं लक्ष आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य केले. राजकीय घडामोडींना सुरुवात झाली असून दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

पार्थ पवारांच्या सलग दोन दिवसांच्या भेटी, अडीच तासांची चर्चा आणि नेत्यांकडून येणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. या सगळ्या घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. त्यातच उद्या उद्धव ठाकरेही शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिल्व्हर ओकवरील भेटीगाठींचं राजकीय महत्त्व आणखी वाढल आहे. पवारांच्या भेटीगाठींमधून राजकीय विलीनीकरणाची नवी वाट तयार होत. की या केवळ सदिच्छा भेटी आहेत? हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES