• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /आता एजंटची दादागिरी संपणार, म्हाडा भाड्याने घरे उपलब्ध करून देणार, लवकरच पोर्टल येणार

आता एजंटची दादागिरी संपणार, म्हाडा भाड्याने घरे उपलब्ध करून देणार, लवकरच पोर्टल येणार

सर्वसामान्यांना राज्यभरात भाड्याने घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा दिवाळीत रेंटल हाऊसिंग पोर्टल सुरू करणार

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 14, 2026, 01:42 PM IST|Updated: Oct 14, 2026, 01:44 PM IST
joinshare
आता एजंटची दादागिरी संपणार, म्हाडा भाड्याने घरे उपलब्ध करून देणार, लवकरच पोर्टल येणार
Image Credit: Maharashtra Rental Housing Portal

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईत घरांची मागणी वाढली आहे. बाहेरील राज्यातील तरुण-तरुणी कॉलेजसाठी असो किंवा कामाच्या निमित्ताने मुंबईत येतात. अशावेळी ते राहण्यासाठी भाड्याने घर शोधत असतात. पण मुंबईत सहजासहजी भाड्याने घरं मिळत नाही. मात्र आता ही कटकट मिळणार आहे. म्हाडाने आता मुंबईसह राज्यभरात भाड्याने घरे उपलब्ध करुन देणार आहे.

म्हाडा दिवाळीत रेंटल हाऊसिंग पोर्टल सुरू करणार आहे. या पोर्टलची निर्मिती, व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी गृहनिर्माण विभागाकडून म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोर्टलच्या कामाला गती मिजण्यासोबतच शासनाच्या विविध विभागाशी समन्वय साधणे म्हाडाला सोपे होणार आहे.

मुंबईसह उपनगरात ग्रोथ हब उभारले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात भाड्याच्या घरांना मोठी मागणी असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून रेंडल हाऊसिंग पॉलिसी तयार केली असून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून म्हाडा स्वतःचे पोर्टल लाँच करणार आहे. या पोर्टलच्या निर्मितीसाठी म्हाडाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला कंत्राट दिले आहे. म्हाडाच्या या पोर्टलमुळे घर भाड्याने घेण्यासाठी किंवा देण्यासाठी दलालांवर विसंबून राहण्याची गरज भासणार नाही.

रेंट अॅग्रीमेंट, पोलीस व्हेरिफिकेशन यासारख्या सुविधा पोर्टलवर उपलब्ध असणार आहेत. एकाच प्लॅटफॉर्मवर या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी म्हाडाला नोंदणी व मुद्रांक विभाग, पोलीस, महापालिकेचे काही विभाग जशा विविध विभागांशी समन्यसावा लागणार आहे. म्हाडाच्या पोर्टलच्या माध्यमातून घर भाड्याने दिल्यास किंवा घेतल्यास त्याला कायदेशीरदृश्या संरक्षण असणार आहे.

म्हाडा अर्जांची मुदतवाढ 22 ऑक्टोबर पर्यंत

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या 15% सामाजिक आणि 20% सर्व समावेशक योजनेतील सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 22 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. कागदपत्रांच्या तांत्रिक पडताळणीला होणारा विलंब लक्षात घेऊन म्हाडाने हा निर्णय घेतला आहे मुदत वाढ झाल्याने आता 4 डिसेंबरला अंतिम सोडत काढली जाणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai News
Mumbai