SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बारावीला असलेल्या विद्यार्थी आणि पालकांना सर्वात मोठा दिलासा! आता 2027 मध्ये...; राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्र सरकारने बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतला असून याचा फायदा विद्यार्थी आणि शिक्षकांनाही होणार आहे. नेमका हा निर्णय काय आणि त्याचा कसा फयदा होणार जाणून घेऊयात सविस्तरपणे...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 21, 2026, 02:32 PM IST | Updated: Oct 21, 2026, 02:50 PM IST
Image Credit: राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
Join

बारावीच्या विद्यार्थ्यांचं टेन्शन कमी करणारा एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. सामायिक प्रवेश परीक्षेची (सीईटी) दोनदा संधी देण्याच्या निर्णयात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दोन संधींसंदर्भातील नव्या निर्णयानुसार, डिसेंबरमध्ये होणारी प्रस्तावित सीईटी रद्द करण्यात आली आहे. आता दोन्ही सीईटी परीक्षा बारावीच्या बोर्ड परीक्षेनंतर घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण कमी होणार असून बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना अधिक वेळ मिळणार असल्याने हा शिक्षकांसाठीही दिलासा देणारा निर्णय आहे.

विद्यार्थ्यांना नेमका कोणता फायदा होणार?

विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये चांगले गुण मिळविण्यासाठी दोन स्वतंत्र संधी उपलब्ध होणार आहेत. डिसेंबरमध्ये प्रस्तावित असलेली पहिली सीईटी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने रद्द केली आहे. आता दोन्ही सीईटी परीक्षा बारावीच्या बोर्ड परीक्षेनंतर आयोजित केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेनंतर दुसऱ्या परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी दोन्ही परीक्षामध्ये चार आठवड्यांचे अंतर ठेवण्यात येणार आहे. पूर्वी डिसेंबर 2026 आणि एप्रिल 2027 अशा दोन वेळा परीक्षा घेण्याची योजना होती. विशेषतः ग्रामीण भागातून पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींमुळे डिसेंबरचा अटेम्प्ट रद्द करण्यात आला आहे. 

या निर्णयामुळे बारावीचा अभ्यास आणि सीईटीची तयारी एकाच वेळी करण्याचा ताण विद्यार्थ्यांवर राहणार नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा विशेष फायदा होणार आहे. गावाकडील विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. दोन्ही सीईटी परीक्षांपैकी विद्यार्ध्यांना मिळालेल्या सर्वाधिक गुणांचा प्रवेशासाठी विचार केला जाणार आहे.

विरुद्ध बाजूचेही मत

बारावीचा संपूर्ण अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना अधिक वेळ उपलब्ध होईल. मात्र त्याचवेळी या निर्णयाबद्दल विरुद्ध बाजूनेही शंका व्यक्त केली जात आहे. सीईटी परीक्षेत पारदर्शक कारभार अधिक असायला हवा, असं अभ्यासकांचं मत आहे. कारभारामध्ये पारदर्शकता नसेल तर शंका घेण्यास वाव कायम राहील, असेही शिक्षण तज्ज्ञांचं या निर्णयाबद्दलचं मत आहे.

परीक्षा केंद्राच्या नियमात बदल

एकीकडे विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं टेन्शन कमी करताना बारावीच्या मुख्य परीक्षेनंतर दोन्ही सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी परीक्षा केंद्राचे काही नियमही बदलले आहेत. विद्यार्थ्यांना आता आवडीचा जिल्हा निवडता येणार नाही. केंद्र बारावी पूर्ण केलेल्या कॉलेजच्या पिन कोडनुसार त्याच जिल्ह्यात किंवा जवळच्या परिसरात दिले जाईल. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES