• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /महाराष्ट्रात खळबळ! ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचा फोन हॅक झाल्यानंतर बड्या मंत्र्याचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम हॅक

महाराष्ट्रात खळबळ! ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचा फोन हॅक झाल्यानंतर बड्या मंत्र्याचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम हॅक

ठाण्याच्या पोलीस आयुक्तांपाठोपाठ बड्या मंत्र्याचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम हॅक झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली असून डिजीटल सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 17, 2026, 20:55 IST|Updated: Nov 17, 2026, 20:57 IST
joinshare
महाराष्ट्रात खळबळ! ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचा फोन हॅक  झाल्यानंतर बड्या मंत्र्याचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम हॅक

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई सायबर क्राईम :  ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा मोबाईल फोन हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप स्टेटसवरून अश्लील व्हिडिओ प्रसारित झाल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ  उडाली. धक्कादायक बाब म्हणजे हे व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न करूनही ते हटवले जात नसल्याची माहिती आहे.ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचा फोन हॅक झाल्यानंतर बड्या मंत्र्याचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम हॅक झाले आहे. 

मंत्री उदय सामंत यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम हॅक झाले आहे.  उदय सामंत यांनीच फेसबुक आणि इन्स्टाग्राम हॅक झाल्याची माहिती दिली. काल माझं इन्स्टाग्राम हॅक झाले होते. आज माझ फेसबुक हॅक झाले आहे. माझ्या अकाऊंटवरुन 3,500 रुपये पाठवल्याचा मेसेज येत आहे.  आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हॅकिंगचे प्रकार वाढत असल्याने डिजीटल सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पुराव्याशिवाय कोणावरही थेट आरोप करणे योग्य नसल्याची भूमिका मांडली आहे. पोलीस आयुक्त ठोंबरे यांचा फोन हॅक झाल्याचा दाखला देत हॅकिंग प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. असा प्रकारे हॅकिंग करणाऱ्यांना गजाआड केले पाहिजे असंही उदय सामंत म्हणाले. 

ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या फोनवरुन अश्लील व्हिडिओ प्रसारित

ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचाच मोबाईल फोन हॅक झाला आहे.  त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप स्टेटसवरून अश्लील व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. हे व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न करूनही ते हटवले जात नसल्याची माहिती आहे. या गंभीर प्रकाराची पोलीस प्रशासनाने दखल घेतली असून सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र थेट पोलीस आयुक्तांचाच मोबाईल हॅक करण्याचं धाडस करणारे सायबर भामटे नेमके कोण आहेत? याचा शोध आता सायबर सेल घेत आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Uday Samant