महाराष्ट्रात खळबळ! ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचा फोन हॅक झाल्यानंतर बड्या मंत्र्याचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम हॅक
ठाण्याच्या पोलीस आयुक्तांपाठोपाठ बड्या मंत्र्याचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम हॅक झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली असून डिजीटल सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुंबई सायबर क्राईम : ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा मोबाईल फोन हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप स्टेटसवरून अश्लील व्हिडिओ प्रसारित झाल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे हे व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न करूनही ते हटवले जात नसल्याची माहिती आहे.ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचा फोन हॅक झाल्यानंतर बड्या मंत्र्याचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम हॅक झाले आहे.
मंत्री उदय सामंत यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम हॅक झाले आहे. उदय सामंत यांनीच फेसबुक आणि इन्स्टाग्राम हॅक झाल्याची माहिती दिली. काल माझं इन्स्टाग्राम हॅक झाले होते. आज माझ फेसबुक हॅक झाले आहे. माझ्या अकाऊंटवरुन 3,500 रुपये पाठवल्याचा मेसेज येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हॅकिंगचे प्रकार वाढत असल्याने डिजीटल सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुराव्याशिवाय कोणावरही थेट आरोप करणे योग्य नसल्याची भूमिका मांडली आहे. पोलीस आयुक्त ठोंबरे यांचा फोन हॅक झाल्याचा दाखला देत हॅकिंग प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. असा प्रकारे हॅकिंग करणाऱ्यांना गजाआड केले पाहिजे असंही उदय सामंत म्हणाले.
ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या फोनवरुन अश्लील व्हिडिओ प्रसारित
ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचाच मोबाईल फोन हॅक झाला आहे. त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप स्टेटसवरून अश्लील व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. हे व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न करूनही ते हटवले जात नसल्याची माहिती आहे. या गंभीर प्रकाराची पोलीस प्रशासनाने दखल घेतली असून सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र थेट पोलीस आयुक्तांचाच मोबाईल हॅक करण्याचं धाडस करणारे सायबर भामटे नेमके कोण आहेत? याचा शोध आता सायबर सेल घेत आहे.