SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

‘फडणवीसांनी राज ठाकरेंना दिलेली सिक्युरिटी काढण्यात येईल त्यावेळी ते...’; भाजपा नेत्याचा खोचक टोला

राज ठाकरेंनी बुधवारी मुंबईत बोलताना केलेल्या विधानामुळे भारतीय जनता पार्टीकडून कठोर शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवल्या जात असतानाच आता त्यात अजून एका टीकेची भर पडली आहे. यावेळी थेट राज यांना देण्यात आलेल्या सुरक्षेचा उल्लेख करण्यात आलाय.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 22, 2026, 11:54 AM IST | Updated: Oct 22, 2026, 12:16 PM IST
Image Credit: फडणवीसांचा उल्लेख करत टीका
Join

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी केलेल्या चर्चेदरम्यान देशातील रेजीम चेंजसंदर्भात व्यक्त केलेल्या शक्यतेवरुन आता भारतीय जनता पार्टीने राज यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. आधी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावरुन राज यांच्यावर निशाणा साधला असतानाच आता थेट राज यांना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे सुरक्षा मिळाल्याचा उल्लेख करत भाजपाच्या नेत्याने मनसे अध्यक्षांना रेजीम चेंजवरुन डिवचलं आहे.

राहुल गांधींनी राज यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवल्याने ते...

भाजपाचे नेते परिणय फुके यांनी राज ठाकरेंना टोला लगावताना लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे सध्या व्हिएतनामला पिकनिकसाठी गेलेले असल्याने अतिरिक्त कार्यभार राज यांच्याकडे सोपवून गेल्याचं म्हटलं आहे. "राहुल गांधींनी सध्या ॲडिशनल चार्ज त्यांच्याकडे दिल्या त्यामुळे ते असे वक्तव्य करत आहेत," असा टोला फुके यांनी राज ठाकरेंना लगावला.

ही सिक्युरिटी काढण्यात येईल त्यावेळी...

तसेच, "राज ठाकरे इतक्या मोठ्या रेझीम चेंजबाबत ज्या बाता करत आहेत ते स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सिक्युरिटीच्या आधारावर बोलत आहेत.  त्यांच्याकडे संविधानिक पद नाही. त्यामुळे त्यांना ही सिक्युरिटी देण्याची गरज नाही. म्हणूनच ज्या दिवशी ही सिक्युरिटी काढण्यात येईल त्यावेळी ते घराबाहेर निघणार नाहीत," असा टोला फुकेंनी राज यांना लगावला आहे.

राहुल गांधींच्या दौऱ्यावरुन बोलले

राहुल गांधींवरही निशाणा साधताना फुके यांनी, "प्रत्येक व्यक्तीला काही दिवसानंतर आपल्या बायका पोरांची आठवण येते," असं खोचक विधान केलं. "कितीही काम केलं, कितीही भाषण केले, कितीही आंदोलन केले तरी दोन-तीन महिन्यात आपल्या परिवाराकडे जाण्याची त्याची इच्छा असते म्हणूनच राहुल गांधी व्हिएतनामला गेले आहेत. यात काही वावगं नाही," असं फुके यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी अविवाहित आहेत मात्र ब्रह्मचारी नाही

"कितीही काम केलं, कितीही भाषण केले, कितीही आंदोलन केले तरी दोन-तीन महिन्यात आपल्या परिवाराकडे जाण्याची त्याची इच्छा असते म्हणूनच राहुल गांधी व्हिएतनामला गेले आहेत. यात काही वावगं नाही," असं फुके यांनी म्हटलं आहे. "राहुल गांधी अविवाहित आहेत मात्र ब्रह्मचारी नाही असं त्यांच्याबद्दल एक मतं आहे. त्यांच्या पक्षातील लोकांच्या माध्यमातून हे मत आलंय. दोन - तीन महिन्याकरता राहुल गांधी तिकडे गेले आहेत आरामाकरता! त्यांनी ॲडिशनल चार्जवर उद्धव ठाकरे जन राज ठाकरे यांना दिलेला आहे," असं परिणय फुकेंनी म्हटलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES