SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मुंबई-पुणे प्रवास आता आणखी वेगवान होणार, मिसिंग लिंकनंतर 'या' महामार्गाचा विस्तार होणार

मुंबई-पुणे महामार्गाबाबत एक मोठी बातमी समोर येतेय. आता जुन्या महामार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे. कसा असेल हा प्रकल्प, जाणून घेऊयात

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 09, 2026, 11:12 IST | Updated: Nov 09, 2026, 11:15 IST
Image Credit: MSRDC plans six laning of old Pune Mumbai highway
Join

मुंबई ते पुणे प्रवासासाठी लागणारा वेळ आता आणखी कमी होणार आहे. काही दिवसांपूर्वी नवीन मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर आता जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचेही सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतली असून याबाबत लवकरच सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे.

जुन्या-मुंबई महामार्गाचे सहापदरीकरण प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळं जुन्या मुंबई-पुणे महामार्गाची क्षमता वाढणार असून या महामार्गावरील सहापदरीकरणासाठी नेमका किती खर्च येणार हे आराखडा तयार झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र एमएसआरडीसीच्या अंदाजानुसार यासाठी 5 ते 6 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा खर्च वसूल करण्यासाठी 'एमएसआरडीसी'ने महामार्गावरील पथकर वसुलीच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाआधी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन वाहतूक सुरू होती. हा महामार्ग सुमारे 150 ते 156 किमी लांबीचा होता. तसंच, दुपदरी होता. मात्र वाहतूक वाढल्यानंतर या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. सध्या या महामार्गावर क्षमतेपेक्षा जास्त वाहने धावतात. प्रतिदिन केवळ 40 हजार वाहनांची क्षमता असताना अंदाजे 70 हजार वाहने धावतात. त्यामुळं या माहमामार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे.

या महामार्गावरील निगडी ते शिळफाटा अशा 110.8 किमीच्या महामार्गाच्या सहापदरीकरण आणि सुधारीकरणाचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराच्या नियुक्तीसाठी शुक्रवारी निविदा प्रसिद्ध केल्याची माहिती एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली. निविदा प्रक्रिया पूर्ण करून 2027 च्या सुरुवातीला आराखड्याच्या कामाला सुरुवात करून आराखडा अंतिम करून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES