SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

NCMC हेल्पलाइनवर एसटी महामंडळाने मराठी भाषेला डावलले! केवळ हिंदी आणि इंग्रजीचाच पर्याय; ज्येष्ठ नागरिकांमध्ये गोंधळ

मराठी भाषा सक्तीसाठी आग्रही राहिलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील एसटी महामंडळानेच मायमराठी डावलल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Sep 30, 2026, 08:09 AM IST | Updated: Sep 30, 2026, 08:25 AM IST
Image Credit: मराठीला डावलण्यात आल्याने संताप (प्रातिनिधिक फोटो)
Join

एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या सवलतींसाठी बंधनकारक केलेल्या एनसीएमसी कार्डाबाबत नवीन वाद समोर आला आहे. कार्डच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी महामंडळाने सुरू केलेल्या हेल्पलाइनवर मराठी भाषेलाच डावलण्यात आले असून संवादासाठी केवळ हिंदी आणि इंग्रजीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मराठी भाषा सक्तीसाठी आग्रही राहिलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील एसटी महामंडळानेच मायमराठी डावलल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेल्पलाइन कशासाठी आहे?

एसटी महामंडळाने सवलतीच्या प्रवासासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले आहे. हे कार्ड वापरताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी 022-42022190 आणि 022-69787303 हे दोन हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहेत. यावरून 'कार्ड अॅक्टिव्हेशन', रक्कम टॉपअप, उपलब्ध शिल्लक तपासणी आणि इतर तांत्रिक समस्या सोडवण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. मात्र या हेल्पलाईनवर संपर्क साधणाऱ्या प्रवाशांना केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेचाच पर्याय देण्यात आला आहे.

तीव्र संताप

एनएसडीएल पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून हेल्पलाइन सुरु करताना एसटी महामंडळाला मराठी भाषेचा पर्याय प्राधान्याने देण्याचा विसर पडला आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीमध्ये मराठीचा वापर प्रामुख्याने होणे आवश्यक असताना मराठीला डावलल्याने प्रवासी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

मराठीला डावलले गेल्याचे निदर्शनास कसे आले नाही

एकीकडे परिवहन मंत्री सरनाईक यांनी व्यावसायिक वाहनांच्या चालकांना मराठी भाषा सक्तीची केली आहे. परिवहन मंत्री नात्याने ते एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत. मराठीप्रेम दाखवताना त्यांना एसटी महामंडळाकडून मराठीला डावलले गेल्याचे निदर्शनास कसे आले नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. मुंबईबरोबरच राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करणाऱ्या सरनाईकांच्या नजरेतून ही गोष्ट कशी काय सुटली अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे. त्यामुळेच आता या प्रकरणामध्ये सरनाईक लक्ष घालणार का? हे पाहवं लागणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये गोंधळ

एसटीने प्रवास करणारे बहुतांश ज्येष्ठ नागरिक ग्रामीण भागातील आहेत. त्यांना हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधल्यानंतर हिंदी किंवा इंग्रजी भाषांमध्ये तांत्रिक अडचणी स्पष्ट करणे कठीण जात आहे. याबाबत अनेक प्रवासी हेल्पलाईनवर संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. मराठीचा पर्याय नसल्यामुळे एसटीची हेल्पलाईन ही ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी सोईची ठरण्याऐवजी गोंधळाचे वातावरण निर्माण करीत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES