• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /एसटीच्या NCMC कार्डबाबत मोठा निर्णय, आता फक्त 5 रुपयांत...

एसटीच्या NCMC कार्डबाबत मोठा निर्णय, आता फक्त 5 रुपयांत...

एसटी महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे जाणून घ्या.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 28, 2026, 15:48 IST|Updated: Nov 28, 2026, 15:53 IST
joinshare
एसटीच्या NCMC कार्डबाबत मोठा निर्णय, आता फक्त 5 रुपयांत...
Image Credit: MSRTC reduced the minimum top-up limit for its NCMC smart cards from Rs 50 to Rs 5

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

एसटी महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डधारक प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, आता कार्डमध्ये केवळ 5 रुपयांचे टॉपअप करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी किमान 50 रुपयांचे टॉपअप करणे आवश्यक होते. ही अट रद्द करून प्रवाशांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक लाभार्थ्यांसाठी 16 फेब्रुवारी 2026 पासून एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत 1.47 कोटी कार्डांची नोंदणी झाली असून, त्यापैकी 1.30 कोटी कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत.

ग्रामीण व दुर्गम भागातील कमी अंतराच्या प्रवासासाठी कमी भाडे लागत असल्याने तसेच अमृत ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास विनामूल्य असल्याने केवळ अधिभारासाठी मोठी रक्कम कार्डमध्ये ठेवावी लागू नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक सुलभता मिळणार आहे.

एनसीएमसी  स्मार्ट कार्ड टॉप-अप करणे खूप सोपे आहे. ही प्रक्रिया मुख्यतः दोन टप्प्यांत पूर्ण होते. पहिले म्हणजे ऑनलाइन पैसे भरणे  आणि दुसरा म्हणजे कार्डवर रक्कम अद्ययावत करणे

तुम्ही गुगल पे, फोनपे, पेटीएम किंवा संबंधित बँकेच्या अॅपवरून रिचार्ज करू शकता

सगळ्यात पहिले अॅप उघडा: तुमच्या UPI अॅपमध्ये  जाऊन 'Metro Recharge' किंवा 'NCMC Card Recharge' हा पर्याय निवडा.

बँक/ऑपरेटर निवडा: तुमचे कार्ड ज्या बँकेचे किंवा संस्थेचे आहे ते निवडा.

कार्ड क्रमांक आणि रक्कम टाका: कार्डवरील 16 अंकी क्रमांक टाका आणि तुम्हाला हवी असलेली रक्कम निवडा.

पेमेंट पूर्ण करा: UPI पिन टाकून पेमेंट पूर्ण करा.

2. ऑफलाइन पद्धतीने (थेट स्थानकावर)
जर तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करायचे नसेल, तर तुम्ही थेट मेट्रो स्थानक किंवा बस डेपोमधील तिकीट खिडकीवर जाऊन रोख  किंवा कार्ड/UPI द्वारे पैसे देऊन तात्काळ कार्ड टॉप-अप करून घेऊ शकता.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
MSRTC
Mumbai
Maharashtra News