• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मुंबई महापौर पुन्हा नव्या वादात! सोशल मीडियातील प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या खर्चाचा प्रस्तावाला मंजुरी

मुंबई महापौर पुन्हा नव्या वादात! सोशल मीडियातील प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या खर्चाचा प्रस्तावाला मंजुरी

मुंबईच्या महापौर रितू तावडे या पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. सोशल मीडियातील प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या खर्चाचा प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 09, 2026, 12:11 PM IST|Updated: Oct 09, 2026, 12:20 PM IST
joinshare
मुंबई महापौर पुन्हा नव्या वादात! सोशल मीडियातील प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या खर्चाचा प्रस्तावाला मंजुरी
Image Credit: मुंबई महापौर पुन्हा नव्या वादात!

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुन्हा एकदा मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. महापौरांच्या अधिकृत बंगल्यावरील खर्चाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं होतं. आता महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख होणार आहे का? असा प्रश्न उपस्थितीत होतोय. कारण महापौरांच्या सोशल मीडियातील प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या खर्चाचा प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

दोन महिन्यापूर्वी हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, तेव्हा महापौरांकडून म्हणण्यात आलं होतं की, सोशल मिडीया प्रसिद्धीच्या कंत्राटावरुन आपल्याला नाहक लक्ष्य केलं जात. आता जेव्हा या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महापौर आता काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सोशल मिडीया प्रसिद्धीसाठी आधी ज्या रनटाईम मिडिया कंपनीवर महापौरांनी आक्षेप घेतला त्याच कंपनीला कंत्राट देण्यात आलंय.  आधी प्रसिद्धीसाठी कोणताही वेगळा खर्च नको अशी भूमिका घेणा-या मुंबईच्या महापौर रितु तावडे यांच्या सोशल मिडीया प्रसिद्धीसाठी २५ लाख रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीनं मंजूर केलाय.  

विशेष म्हणजे याच प्रस्तावावरुन गेल्या वेळी जेव्हा वादंग निर्माण झाला तेव्हा माझ्याबद्दल कोणताही प्रस्ताव सादर करण्यापूर्वी माहिती द्या म्हणणा-या महापौरांना आता कोणत्याही चर्चेविना मंजूर झालेल्या प्रस्तावाची माहिती नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. यापूर्वी २० ऑगस्टच्या स्थायी समितीत हा प्रस्ताव आला आणि महापौरांवर टीकेची झोड उठली तेव्हा पत्रकार परिषद घेऊन महापौरांनी प्रशासनाली अतिशय कडक शब्दात धारेवर धरले होते.

महापौरांच्या आधीच्या पत्रकार परिषदेत नेमके काय घडले?

महापौरांची नेमकी भूमिका काय होती?

कंपनीच्या निवडीशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण- रनटाईम सोल्युशन्स या कंपनीला कंत्राट देण्याच्या निर्णयात आपला सहभाग नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

प्रस्तावावर आक्षेप आपल्या नावाने प्रस्ताव सादर करण्यापूर्वी आपल्याला माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

जनसंपर्क अधिका-यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी जनसंपर्क अधिका-यांकडून महापौरांच्या बाबत मांडल्या जाणा-या प्रस्तावांबाबत नाराजी व्यक्त केली

२५ लाखांच्या खर्चावर वाद- १ ऑगस्ट २०२६ ते ३१ जुलै २०२७ या कालावधीसाठी २५ लाख १२ हजार ७८६ रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. प्रस्तावात निविदा प्रक्रिया न झाल्याचा उल्लेख होता.

महापौरांची भूमिका- महापालिकेची सोशल मीडिया हाताळणारी कंपनी आधीपासूनच कार्यरत असून, स्वतंत्र प्रसिद्धी संस्था नेमण्याचा निर्णय आपण घेतलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai