• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवून मुंबईतील वृद्ध दाम्पत्याकडून लुबाडले 6.38 कोटी; नेमकं काय आहे प्रकरण?

तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवून मुंबईतील वृद्ध दाम्पत्याकडून लुबाडले 6.38 कोटी; नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईतील दहिसरमध्ये एका घरात दहा वर्षापासून अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा खेळ सुरु होत. या वृद्ध दाम्पत्याने या अघोरी पूजेसाठी चक्क सोनं, फ्लॅट आणि शेअरही विकले.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 17, 2026, 18:36 IST|Updated: Nov 17, 2026, 21:01 IST
joinshare
तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवून मुंबईतील वृद्ध दाम्पत्याकडून लुबाडले 6.38 कोटी; नेमकं काय आहे प्रकरण?
Image Credit: dahisar senior couple black magic

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईतील दहिसर परिसरातून एक भयानक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या एका सेवानिवृत्त वृद्ध दाम्पत्याला अंधश्रद्धा आणि काळ्या जादूच्या नावाखाली 6.38 कोटींना लुबाडलं आहे. जादूटोणा, शाप आणि दुष्ट शक्तींची भीती दाखवून त्यांना एक नाही दोन नाही तब्बल 10 वर्षांपासून गंडवण्यात येत होतं. त्या दाम्पत्याने या अघोरी पूजेसाठी आपली आयुष्यभराची कमाई गमावली आहे. चार फ्लॅट्स, 1200 ग्रॅम सोने, कोट्यवधी रुपयांचे शेअर्स आणि रोख रक्कम या अंधश्रद्धेत त्यांनी पाण्यात बुडवली आहे. ही सगळं घडलं पारशी दारा मेहता यांच्यासोबत...त्यांनी 13 नोव्हेंबर 2026 ला दहिसर पोलिसांकडे आपली तक्रार दाखल केली. मेहता यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी उमेश देशपांडेसह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

नेमकं काय आहे प्रकरण?

मेहता यांनी तक्रारीत सांगितलं की, दहिसर पूर्वमधील गायत्री सोसायटीमध्ये ते राहतात. तिथे शेजारी राहणाऱ्या मेघना इनामदारकडून पनवेलच्या रमाबाई साने आणि त्यांचे साथीदार उमेश देशपांडे यांच्याबद्दल त्यांना समजलं. ही गोष्ट आहे 2016 मधील. दारा मेहता यांना तीनवेळा लकव्याचा झटका येऊन गेला होता. त्यामुळे त्यांना सांगण्यात आलं की, घरात वास्तूदोष आणि जादूटोणा आहे. त्यासाठी पूजा करावी लागणार आहे. यापूजेसाठी त्यांच्याकडून 40 ग्रॅम सोन्याची साखळी आणि 3.85 लाख घेतलेत.

पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. या टोळीने फसवणुकीसाठी अनेक बनावट पात्रे तयार केले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी उमेश हा हैदराबादमधील एका मठातील 108 वर्षीय गुरूवर्य आहे, असा आवाज काढून लोकांना गंडवत होता. दरम्यान, अश्विनी गायकवाड, स्नेहलता दीक्षित उर्फ ​​बाईसाहेब आणि वृषाली गायकवाड, रमाबाई साने या जोडप्याशी संवाद साधत असत. आरोपींनी नंतर रमाबाईंच्या हत्येबद्दल आणि कामशेतमधील बाईसाहेबांच्या समाधीबद्दल खोट्या कहाण्या रचल्या. या टोळीने यापूर्वीही मुंबईतील एका निवृत्त अधिकाऱ्याला शेअर बाजारात भरघोस परताव्याचे आमिष दाखवून 5.10 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. 

नेपाळी भिक्षूकडून खाण्यासाठी राख आणि शेंदूर...

पोलिसांच्या तपास असं समोर आलं की, दहिसरमधील दाम्पत्याच्या घरी अघोरी पूजा करण्यात आली होती. इथे काळी बाहुली ठेवली होती. तसंच या दाम्पत्याला एका नेपाळी साधूची राख आणि कुंकू खायला दिले होते. या जोडप्याने पूजा करावी म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी सांगण्यात आलं की, मालमत्ता चेटकिणी आणि दुष्ट शक्तींच्या प्रभावाखाली आहे. जर त्यांनी पूजा केली नाही तर त्यांच्या पतीला आणि दोन मुलांचा मृत्यू होईल. मालमत्ता शुद्ध करण्याच्या नावाखाली, आरोपीने त्या जोडप्याला दहिसर आणि बोरिवलीमधील चार फ्लॅट्स विकायला सांगितले. आरोपीने या फ्लॅट्सच्या विक्रीतून अंदाजे 3.02 कोटी रुपये मिळालेत. या पूजेसाठी त्यांनी अंदाजे ₹1.60 कोटींचे शेअर्स विकले. तर बँक आणि पोस्ट ऑफिसमधील ₹4.5 कोटींची ठेवी मोडली. एवढंच नाहीतर घरातील फर्निचरदेखील ताब्यात घेतले. मठ बांधण्याच्या नावाखाली, त्या जोडप्याला एका सावकाराकडून 8% मासिक व्याजदराने ₹4.5 दशलक्ष कर्ज घेण्यास भाग पाडले. तक्रारीनुसार, हे कर्ज फेडण्यासाठी त्या जोडप्याने अंदाजे ₹9 दशलक्ष खर्च केला होता. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Mumbai