SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अंधेरी स्टेशनवर उतरला, सहप्रवाशावर चाकू मारला, पण नेम चुकला अन्...; मुंबई लोकलमध्ये आणखी एक हादरवणारा प्रकार

मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात दोघांच्या भांडणात तिसऱ्याच प्रवासाला गंभीर दुखापत झाली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 17, 2026, 12:13 IST | Updated: Nov 17, 2026, 12:14 IST
Image Credit: Mumbai local train knife thrown during two passengers dispute
Join

मुंबई लोकलमध्ये वारंवार घडणारे वाद आणि गुन्हे हा चिंतेचा ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी लोकलमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर लोकलमध्ये मारहाण व हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका घटनेने खळबळ उडाली आहे. मुंबईच्या लोकलमध्ये प्रवाशांमधील वादातून धक्कादायक घटना घडली आहे. भांडणादरम्यान फेकलेला चाकू थेट  प्रवाशाच्या छातीत घुसल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

दोन प्रवाशांमधील भांडणादरम्यान फेकलेला चाकू थेट तिसऱ्याच प्रवाशाच्या छातीत घुसल्याने ५३ वर्षीय सुरेश शर्मा जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी विरार-चर्चगेट जलद लोकलमध्ये घडली. विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलमध्ये अंधेरी स्थानकातून गाडी सुटल्यानंतर हा प्रकार घडला. या या घटनेत सुरेश शर्मा (53) हे प्रवासी जखमी झाले. चाकू फेकल्याच्या आरोपावरून शिवा गायकवाड (25) याला वांद्रे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धारावी येथे राहणारे सुरेश शर्मा कामानिमित्त बोरीवली येथे गेले होते. तेथून परतताना लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर त्यातील एक प्रवासी अंधेरी स्थानकात उतरला. मात्र, लोकल पुढे जात असताना त्याने दुसऱ्या प्रवाशाच्या दिशेने चाकू फेकला. मात्र, हा चाकू सुरेश शर्मा यांच्या छातीत लागला. छातीला खोल जखम झाल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

साखळी ओढल्यामुळे लोकल वांद्रे स्थानकात थांबवण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी जखमी शर्मांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, चाकू फेकल्याचा आरोप असलेल्या 25 वर्षीय शिवा गायकवाड याला वांद्रे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

दरम्यान, जखमी शर्मा यांच्यावर वांद्रे स्थानक व्यवस्थापकाच्या कार्यालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. आता त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

मयंक लोहार हत्या प्रकरण काय?

मयंक लोहार कामावरुन परत जात असताना ट्रेनच्या दाराजवळ पावसाचे पाणी आत आल्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला होता. इतर प्रवाशांनी त्यांना एकमेकांपासून वेगळे केले. गोरेगाव आणि मालाड दरम्यान लोकलची आपत्कालीन साखळी (अलार्म चेन) ओढली गेल्यानंतर, आरोपीने मयंकच्या छातीवर आणि पोटावर चाकूने वार केले. त्याला शताब्दी रुग्णालयात नेले असता, तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES