• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मुंबई लोकलबाबत मोठी अपडेट, दीड तासांचा प्रवास 40 मिनिटांत, मध्य रेल्वेची नवी मार्गिका लवकरच सुरू होणार

मुंबई लोकलबाबत मोठी अपडेट, दीड तासांचा प्रवास 40 मिनिटांत, मध्य रेल्वेची नवी मार्गिका लवकरच सुरू होणार

पनवेल कर्जत रेल्वे मार्गिका लवकरच पूर्णत्वास येणार आहे. या मार्गिकेचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 19, 2026, 01:57 PM IST|Updated: Oct 19, 2026, 01:59 PM IST
joinshare
मुंबई लोकलबाबत मोठी अपडेट, दीड तासांचा प्रवास 40 मिनिटांत, मध्य रेल्वेची नवी मार्गिका लवकरच सुरू होणार
Image Credit: panvel karjat local

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

प्रवाशांना मध्य रेल्वे लवकरच आनंदाची बातमी येणार आहे. पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गावर लवकरच लोकल धावणार आहे. 'मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट फेज-3' अंतर्गत काम केले जात असलेल्या या प्रकल्पाचे 99 टक्के पूर्ण झाले आहे.  या प्रकल्पामुळं उपनगरीय रेल्वेची कनेक्टिव्हीटी वाढणार आहे. त्यामुळं नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे.

पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गामुळं नवी मुंबई, रायगड आणि आसपासच्या परिसराचा विकास होणार आहे. या प्रकल्पासाठी 2,782 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला असून 29.6 किमी लांबीच्या दुहेरी उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम करण्यात येत आहे. या यामध्ये 9 मोठे पूल, 35 छोटे पूल, 5 रोड़ ओव्हर ब्रिज, 16 रोड अंडर ब्रिज आणि पनवेल व कर्जत येथील दोन्ही रेल्वे फ्लायओव्हर्सचे काम पूर्ण झाले आहे.

तसेच तीनही बोगद्यांचे काम, बोगद्यांतील विद्युत आणि यांत्रिक कामे प्रगतिपथावर आहेत. रेल्वे मार्ग जोडणी (ट्रॅक लिंकिंग) पूर्णत्वाच्या दिशेने असून एकूण 69.70 किमीपैकी 68.70 किमी मार्ग बनवण्यात आला आहे. तसेच 68.70 किमी अंतरापर्यंत खडीचा थर तयार करण्याचे आणि ट्रॅक नूतनीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे.

सिग्नलिंगची कामे 95 टक्क्यांपर्यंत

चिखले आणि मोहापे येथील स्थानक इमारती, चौक येथे स्थानक इमारत व सब वे, प्लॅटफॉर्मवरील शेल्टर आणि परिसरातील कामे झाली आहेत. कर्जत स्थानकावर प्लॅटफॉर्मचा विकास, स्थानक इमारती, प्लॅटफॉर्मवरील छत, लिफ्ट, सरकते जिने आणि इतर प्रवासी सुविधांचे काम अंतिम टप्प्यात आहे. सिग्नलिंगची कामे सुमारे 95 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहेत. संपूर्ण प्रकल्प डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

पनवेल कर्जत रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर दीड तासांचा प्रवास अवघ्या 40 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे कल्याण आणि ठाणे स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी होणार असून नवी मुंबई आणि रायगडमधील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.

एकूण 5 स्थानके

पनवेल, चिखले, पोयंजे (पूर्वीचे मोहपे),  चौक, कर्जत

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai Local
Mumbai News
Mumbai