• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /विरारकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार, बोरीवली स्थानकात मोठे बदल, नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार

विरारकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार, बोरीवली स्थानकात मोठे बदल, नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार

विरारकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार आहे. पश्चिम रेल्वेकडून महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात येत आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Sep 29, 2026, 02:25 PM IST|Updated: Sep 29, 2026, 02:30 PM IST
joinshare
विरारकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार, बोरीवली स्थानकात मोठे बदल, नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार
Image Credit: Western Railway to add four new platforms

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

विरारकरांना लोकल प्रवास हा नेहमीच गर्दीतून आणि धक्काबुक्की करत करावा लागतो. चर्चेगेट-विरार प्रवासाला दोन तास तरी लागतात. लांबचा प्रवास मात्र तोही गर्दीतून करावा लागत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र आता प्रवाशांचा लोकल प्रवास सुखद होणार आहे.

पश्चिम रेल्वेने बोरीवली स्थानकात दोन नवे प्लॅटफॉर्म उभारण्याचे नियोजन अंतिम केले आहे. यामुळे अंधेरी-विरार विभागात 30 ते 40 अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. बोरीवली-विरार पाचवी-सहावी मार्गिका प्रकल्पाचा भाग म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 3च्या उत्तर टोकाला 330 मीटर लांब आणि सात मीटर रुंद होम प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे.

या प्लॅटफॉर्मवरुन विरारसाठी सुरू आणि विरारहून संपणाऱ्या लोकल चालविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मुख्य मार्गिका मोकळी राहण्यास मदत होईल. तसेच गोरेगाव-बोरीवली हार्बर मार्गिका विस्ताराचा भाग म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या दक्षिणेला 330 बाय ७मीटरचा प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे. सध्या येथे स्टेबलिंग मार्गिका असून, त्या स्थलांतरित केल्यानंतर काम सुरू होईल. याशिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक 10ची उत्तर दिशेला 85मीटर आणि दक्षिण दिशेला 110 मीटर लांबी वाढविण्यात येईल.

अंधेरी, विरार स्थानकांमध्येही नवे प्लॅटफॉर्म

अंधेरी आणि विरार स्थानकात पूर्वेकडील बाजूला प्रत्येकी एक नवीन प्लॅटफॉर्म उभारण्याची योजना आहे. पाचवी-सहावी मार्गिका स्वतंत्र झाल्यानंतर विरार-डहाणू लोकलला मेल-एक्स्प्रेसच्या मार्गिकेची वाट पाहावी लागणार नाही. त्यामुळे वेळेचे नियोजन सुधारून 30 ते 40 अतिरिक्त लोकल चालविता येतील.

बोरीवलीहून बोरीवलीहून विरारची लोकल मिळाल्याने सांताक्रूझ-अंधेरीच्या प्रवाशांनाही फायदा होईल. सध्या चार मार्गिकांवर लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. दोन मार्गिका वाढल्याने मेल-एक्स्प्रेस गाड्यांना बोरीवलीबाहेर थांबविण्याची गरज कमी होऊन वेग वाढण्यास मदत होईल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai Local