• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /लोकलचा लेट मार्क आता टळणार, तुमची लोकल वेळेत स्थानकात येणार; मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

लोकलचा लेट मार्क आता टळणार, तुमची लोकल वेळेत स्थानकात येणार; मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. आता लोकलला लेटमार्क लागणार नाही. त्यामुळं प्रवाशांचा खोळंबादेखील टळणार आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 21, 2026, 07:24 AM IST|Updated: Oct 21, 2026, 07:26 AM IST
joinshare
लोकलचा लेट मार्क आता टळणार, तुमची लोकल वेळेत स्थानकात येणार; मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी
Image Credit: mumbai local train update

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. नोकरदार वर्ग हा लोकलवर अवलंबून आहे. लोकल लेट झाल्यावर ऑफिस गाठायलादेखील उशिर होतो. मात्र आता तुमची लोकल वेळेत स्थानकात दाखल होणार आहे. मध्य रेल्वेचा लोकलचा खोळंबा थांबणार आहे. कसारा तिसऱ्या मार्गाला रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता या रेल्वे मार्गावरुन वाहतूक सुरू होणार असून लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या संचालनात सुधारणा होणार आहे.

कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजेच कसारा ते खर्डी  या 14 किमी मार्गिकेचे लोकार्पण मुख्य सुरक्षा आयुक्त (Commissioner of Railway Safety) गुरु प्रकाश यांच्या हस्ते विधिवत पूजा करून आणि तिसऱ्या मार्गिकेची जोडणी करून करण्यात आले. यामुळे कसारा घाटातील वाहतूक कोंडी आणि लोकलच्या बंचिंग समस्येवर मोठा तोडगा निघणार आहे.

कल्याण-कसारा मार्गावार टिटवाळा, आसनगाव आणि कसारा परिसरातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. मात्र याच मार्गावरुन लोकल, मेल एक्सप्रेस आणि मालगाड्यांची वाहतूक होते. त्यामुळं लोकलचा खोळंबा हा ठरलेला असतो. त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो. मात्र आता तिसरा रेल्वे मार्गिका सुरू झाल्यामुळं लोकलचा वक्तशीरपणा वाढेल.

तिसऱ्या मार्गिकेचा दुसरा टप्पा खर्डी ते आसनगाव हा मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले आहे, तर पुढील तिसरा टप्पा आसनगाव ते कल्याण हा डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचा उद्देश रेल्वे प्रशासनाने ठेवला आहे. यामुळे कसारा घाटातील वाहतूक कोंडी आणि बंचिंगच्या समस्येवर मोठा तोडगा निघणार असून, लोकल सेवांना वेळेत धावण्यास मदत होणार आहे, ज्याचा थेट फायदा शहापूर, कसारा, आसनगावच्या हजारो प्रवाशांना होणार आहे.

रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी 17 ऑक्टोबर रोजी नव्या मार्गाची पाहणी केली. तर 18 ऑक्टोबर रोजी विशेष रेल्वेच्या माध्यमातून वेगाची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर या मार्गावर ताशी 100 किमी वेगाने गाड्या चालवण्यास मंजुरी मिळाली. मात्र खर्डी स्थानकाच्या यार्डातील काही सिग्नलच्या पायाभरणीत त्रुटी आढळल्याने संबंधित सिग्नलच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 100 मीटर अंतरापर्यंत ताशी 30 किमी वेगमर्यादा लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai Local
Mumbai News
Mumbai