• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /टीसी अन् महिला प्रवाशांत वाद, तिकीट तपासताना प्रवाशाचे कपडे फाटले, कांदिवली स्थानकात तणाव, प्रवाशांनी अखेर...

टीसी अन् महिला प्रवाशांत वाद, तिकीट तपासताना प्रवाशाचे कपडे फाटले, कांदिवली स्थानकात तणाव, प्रवाशांनी अखेर...

कांदिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीवरून गोंधळ झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. महिला टीसी आणि महिला प्रवाशामध्ये तिकीट तपासणीवरून वाद झाल्याचे समोर आले आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 17, 2026, 09:07 AM IST|Updated: Oct 17, 2026, 09:10 AM IST
joinshare
टीसी अन् महिला प्रवाशांत वाद, तिकीट तपासताना प्रवाशाचे कपडे फाटले, कांदिवली स्थानकात तणाव, प्रवाशांनी अखेर...
Image Credit: Kandivali railway station

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कांदिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीवरून गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. कांदिवली रेल्वे स्थानकात महिला टीसी आणि महिला प्रवाशामध्ये तिकीट तपासणीवरून वाद झाला आहे. इतकंच नव्हे तर या गोंधळात तिकीट तपासताना झालेल्या गोंधळात महिलेचे कपडे फाटल्याचेही समोर आले आहे.

काय घडलं नेमकं?

महिला टीसीने तिकिटाची मागणी करताच प्रवासी महिलेने पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिला टीसीने प्रवासी महिलेचा पाठलाग केला. मात्र पाठलागादरम्यान प्रवासी महिला तोल जाऊन फलाडावर पडली. तेव्हा तिचे कपडे काही प्रमाणात फाटल्याचे समोर आहे. शुक्रवारी संध्याकाळी कांदिवली रेल्वे स्थानकात ही घटना घडली. या घटनेनंतर स्थानकातील तिकीट तपासणी कार्यालयाबाहेर मोठा जमाव जमला होता.

घटनेनंतर स्थानकात मोठ्या संख्येने प्रवासी जमा झाले होते. तिकीट निरीक्षकाच्या वर्तनावर आक्षेप घेत जमावाने थेट महिला टिसीच्या माफीची मागणी केली. त्यामुळं काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफकडून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

तिकीट निरीक्षक नियमितपणे तिकीट तपासणी करत होत्या त्यावेळी हा प्रकार घडला. महिला टिसी नियमीत पणे तिकीट तपासनीस करत असताना हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती. तसंच, उपस्थित नागरिकांनी टीसीने उद्धट वर्तन केल्याचा आरोप करत कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला शांत केले.

प्रकरण काय?

पश्चिम रेल्वेच्या मुख्य तिकीट निरीक्षक प्रिया अंबावडे या कांदिवली स्थानकावर नियमितपणे तिकीट तपासणी करत होत्या. त्यांनी विनातिकीट प्रवास करणाऱ्या 25 वर्षीय तरुणीला पकडले.  दंडाची रक्कम भरावी लागेल या भीतीने त्या महिलेने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र टीसी अंबावडे यांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीत महिला प्रवाशाचा तोल गेला अन ती फलाटावर पडली. तर महिला टीसीदेखील खाली पडल्या. यात गोंधळात महिला प्रवाशाचे कपडे काही प्रमाणात फाटले.

दरम्यान, या घटनेनंतर विनातिकीट प्रवाशांवर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार रेल्वे कर्मचाऱ्यांना असून, अशा प्रकारे सरकारी कामात अडथळा आणू नये असा इशारा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai Local
Mumbai News