• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /माहिम ज्वेलर्स गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, बिष्णोई गँगचे नाव घेत मालकाने केला मोठा दावा

माहिम ज्वेलर्स गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, बिष्णोई गँगचे नाव घेत मालकाने केला मोठा दावा

मुंबईतील माहिम परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एल. जे. रोडवरील जागृती सोसायटी आणि शोपा हॉटेल जंक्शनजवळ असलेल्या पी. सी. जैन ज्वेलरी शॉप बाहेर सायंकाळी सुमारे 7.35 वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 26, 2026, 10:07 IST|Updated: Nov 26, 2026, 10:10 IST
joinshare
माहिम ज्वेलर्स गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, बिष्णोई गँगचे नाव घेत मालकाने केला मोठा दावा
Image Credit: Mumbai Mahim Firing PC Jain Jewellers Major update connection to the Bishnoi gang emerges

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुण्यानंतर मुंबईदेखील गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे.  मुंबईतील माहिम परिसरात सराफाच्या दुकानाबाहेर गोळीबार केल्याची घटना बुधवारी घडली होती. एल. जे. रोडवरील जागृती सोसायटी आणि शोपा हॉटेल जंक्शनजवळ असलेल्या पी. सी. जैन ज्वेलरी शॉपबाहेर रात्री सुमारे 7 वाजून 35 मिनिटांनी हा गोळीबार करण्यात आला होता. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. ज्वेलर्स मालकाला काही दिवसांपूर्वीच धमकी आल्याची खळबळजनक माहिती समोर येतेय.

प्राथमिक माहितीनुसार, पी सी जैन ज्वेलर्सवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्वेलर्स मालकाला काही दिवसांपूर्वीच खंडणीसाठी धमकी आली होती. ही धमकी बिष्णोई गँगकडून आल्याचा दावा ज्वेलर्स मालकाने केला होता. त्यानुसार पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत.  दहशत निर्माण करून व्यापाऱ्यावर दबाव टाकण्यासाठी आणि खंडणीच्या वादातून हा गोळीबार केला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

धमकी खरंच बिष्णोई गँगकडून आली होती की, बिष्णोई गँगचे नाव घेऊन इतर कोणीतरी धमकी देण्याचा कट रचला आहे का? याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसंच, गोळाबाराचा नेमका उद्देश काय, याचा शोधही पोलिसांकडून घेतला जातोय.

मिळालेल्या  माहितीनुसार, बुधवारी रात्री हेल्मेट घातलेले दोन अज्ञात हल्लेखोर मोटारसायकलवरून घटनास्थळी आले. त्यांनी दुकानाजवळ दुचाकी थांबवली आणि पायरीवरून चालत येत ज्वेलरी शॉपच्या बाहेरून दोन राऊंड फायरिंग केली. या घटनेत ज्वेलरी शॉपचे मालक आणि कर्मचारी सुदैवाने बचावले असून, कोणालाही दुखापत झालेली नाही.

गोळीबार केल्यानंतर दोन्ही हल्लेखोर मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, हल्लेखोरांनी पी. सी. जैन ज्वेलर्सच्या दुकानावर 5 ते 6 गोळ्या झाडल्या असल्याचे  समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त महेंद्र पंडित तसेच माहिम पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पोहोचून तपासणी सुरू केली आहे. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मागील काही महिन्यांत मुंबईतील व्यापारी आणि सेलिब्रिटींना बिश्नोई गँगच्या नावाने धमक्या येण्याच्या व गोळीबाराच्या घटना घडल्या असल्याने या प्रकरणाकडे विशेष गांभीर्याने पाहिले जात आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Mumbai News
crime