• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /10 कोटींची खंडणी, तीन वेळा धमकीचा फोन; स्पॅम समजून दुर्लक्ष केलं, माहिम ज्वेलर्स गोळीबार प्रकरणाचा संपू्र्ण घटनाक्रम

10 कोटींची खंडणी, तीन वेळा धमकीचा फोन; स्पॅम समजून दुर्लक्ष केलं, माहिम ज्वेलर्स गोळीबार प्रकरणाचा संपू्र्ण घटनाक्रम

माहिममध्ये पी सी जैन ज्वेलर्सवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून आरोपींनी 10 कोटींची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 26, 2026, 12:27 IST|Updated: Nov 26, 2026, 12:28 IST
joinshare
10 कोटींची खंडणी, तीन वेळा धमकीचा फोन; स्पॅम समजून दुर्लक्ष केलं, माहिम ज्वेलर्स गोळीबार प्रकरणाचा संपू्र्ण घटनाक्रम
Image Credit: Mumbai Mahim Firing PC Jain Jewellers update

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईतील माहीम येथील पीसी जैन ज्वेलर्स येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून एक महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे. ज्वेलरी दुकानाचे मालक भरत मेघराज जैन यांच्याकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचे समोर आले आहे. खंडणी न दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकीदेखील देण्यात आली होती. आरोपींनी विविध मोबाईल क्रमांकांवरून फोन केले आणि धमकीचे संदेश पाठवले, असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.  

बुधवारी 25नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.35 च्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात गुन्हेगारांनी त्यांच्या दुकानाजवळ येऊन पाच ते सहा  गोळ्या झाडल्या होत्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हेल्मेट घातलेले दोन अज्ञात इसम दुचाकीवरून आले होते. त्यानंतर दुकानाजवळ दुचाकी थांबवून खाली उतरत थेट दुकानाबाहेरील फुटपाथवरून गोळीबार केला होता. या प्रकाराने संपूर्ण मुंबई हादरली होती.

पीसी जैन ज्वेलर्सचे मालक भरत जैन यांना सातत्याने धमक्या येत असल्याचे समोर येत आहे. भरत जैन यांना 18 ऑक्टोबर रोजी पहिली धमकी आली होती. तेव्हा अनोळखी नंबर वरून फोन आल्याने भरत जैन यांनी सुरवातीला दुर्लक्ष केलं. मात्र संध्याकाळी त्यांना गोळी मारण्याची मेसेजद्वारे धमकी देण्यात आली होती.  

दुसरी धमकी भरत जैन यांना 24 तारखेला आली होती.  संध्याकाळी 7 ते 7.15 च्या दरम्यान दोन फोन आले. तो नंबर अनोळखी असल्यामुळे त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर थोड्याच वेळात, त्याच नंबरवरून आणखी एक मेसेज आला, ज्यामध्ये लिहिले होते, "रेडी रखना चमत्कार छाया" भरत जैन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना या मेसेजचा अर्थ समजला नाही, म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

31 ऑक्टोबर रोजी त्यांना तिसरी धमकी आली होती. रात्री साधारण 8.38 वाजता, त्यांना एका अनोळखी नंबरवरून त्याच्या मोबाईलवर एक धमकीचा मेसेज आला. त्यात लिहिले होते, "जय रामजी, जास्त विचार करू नका. ही तुमची जन्मकुंडली आहे. तुमच्याकडे झेड-प्लस सुरक्षा असली तरी तुम्हाला पैसे द्यावेच लागतील. फक्त यमराजाकडे बघा... तुम्हाला १० कोटी रुपये द्यावे लागतील."

सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांमुळं जैन हे घाबरले होते. त्यांनी तात्काळ त्यांचे नातेवाईक अशोक जैन यांना याची माहिती दिली. मात्र, त्यांनी हा एक प्रकारचा स्पॅम किंवा सायबर फसवणुकीद्वारे पैसे उकळण्याचा डाव असल्याचं म्हटलं होतं. भरत जैन यांनी पुढे म्हटलंय की, त्यांचा कोणाशीही वाद नव्हता. तरीही त्यांना असे मेसेज का आले ठावूक नाही. मात्र, यानंतर त्यांनी अनोळखी नंबरवरून येणारे फोन रिसिव्ह करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना पुढे कोणतेही धमकीचे फोन किंवा मेसेज आले नाहीत. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
crime
Mumbai News