• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मुंबईकरांचा खोळंबा कायम, महत्त्वाच्या उड्डाणपुलाला ब्रेक; कारण आलं समोर

मुंबईकरांचा खोळंबा कायम, महत्त्वाच्या उड्डाणपुलाला ब्रेक; कारण आलं समोर

बांधकामाआधीच पुलाच्या आराखड्याची फेरतपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 06, 2026, 11:04 AM IST|Updated: Oct 06, 2026, 11:06 AM IST
joinshare
मुंबईकरांचा खोळंबा कायम, महत्त्वाच्या उड्डाणपुलाला ब्रेक; कारण आलं समोर
Image Credit: mumbai infra news

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

चुनाभट्टी रेल्वे फाटकामुळे लोकल वेळापत्रकावर होणारा परिणाम आणि रस्त्यावरील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी पालिकेचा उड्डाणपुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र बांधकाम करण्याआधीच फेरतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आयआयटी मुंबईची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिका 18.70 लाखांचे शुल्क मोजणार आहे.

दिवा, कुर्ला, चुनाभट्टी आणि शिवडी येथील प्रत्येक फाटक दिवसाला ३० ते ३५ वेळा उघडबंद होते. यामुळे लोकल वेळापत्रकावर परिणाम होतो. परिसरातील रस्ते वाहतूकही विस्कळीत होते. त्यामुळे तेथे उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र, बांधकामापूर्वी आराखड्याची तज्ज्ञ संस्थेकडून छाननी करण्याचे पालिकेने ठरवले आहे. आयआयटी
मुंबईकडून पुलाची संरचनात्मक सुरक्षितता, तांत्रिक गणिते आणि प्रस्तावित बांधकाम पद्धती योग्य आहे का, याची तपासणी केली जाणार आहे.

या फेरतपासणी सल्लागार सेवेचा कालावधी २४ महिने ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुलाचे काम नेमके कधी सुरू होणार आणि किती विलंब होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसंच, या उड्डाणपुलासाठी ऑक्टोबर 2024 मध्ये निविदा काढली होती. या कामाचा अंदाजित खर्च  37.41 कोटी रु. होता. मंजुरीच्या टप्प्यापर्यंत तो 41.77 कोटी रुपयांवर गेला.

असा असेल चुनाभट्टी रेल्वे उड्डाणपूल

पुलाची लांबी रेल्वे क्षेत्रावर : 36 मीटर

पुलाची लांबी महापालिका क्षेत्रावर : 254 मीटर

पुलाची रुंदी रेल्वे क्षेत्रावर : 11.30 मीटर

पुलाची रुंदी महापालिका क्षेत्रावर : 8.5मीटर

बांधकामाचा प्रकार: आरसीसी व लोखंडी बांधकाम

घाटकोपर पुलाचा यू-टर्न

घाटकोपरसाठी नव्या रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू झाले. पण बांधकाम सुरू केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तीन खांब पाडण्याची नामुश्की प्रशासनावर आली आहे. उड्डाणपुलाच्या आराखड्यात त्रुटी निर्माण झाल्या कारणाने सुमारे 30 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर आधीच उभारण्यात आलेले तीन खांब अंशतः पाडण्यात येत आहेत. वाहतुकीची भविष्यातील गरज लक्षात घेऊन हा बदल करण्यात येत असून महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (महारेल) अधिक उंचीवर पुन्हा बांधकाम होणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai News
Infrastructure news
Mumbai