• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मुंबईतील महत्त्वाच्या उड्डाणपुलाचा विस्तार होणार; वाहतुक कोंडी फुटणार तर, या नागरिकांना होणार फायदा!

मुंबईतील महत्त्वाच्या उड्डाणपुलाचा विस्तार होणार; वाहतुक कोंडी फुटणार तर, या नागरिकांना होणार फायदा!

सायन (शीव) उड्डाणपुलाचा विस्तार होणार आहे. त्याचा फायदा मुंबईतील रहिवाशांना होणार आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 26, 2026, 07:54 AM IST|Updated: Oct 26, 2026, 07:58 AM IST
joinshare
मुंबईतील महत्त्वाच्या उड्डाणपुलाचा विस्तार होणार; वाहतुक कोंडी फुटणार तर, या नागरिकांना होणार फायदा!
Image Credit: Mumbai news today

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

अनेक महिन्यांपासून रखडलेला शीव (सायन) उड्डाणपूलाचे अखेर उद्घाटन झाले आहे. या उड्डाणपुलामुळं वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांना आणखी दिलासा देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. शीव उड्डाणपुलाचा आता आणखी विस्तार होणार आहे. या नव्या पुलाच्या कामात आणखी दोन मार्गिका बांधण्यात येणार आहेत.

पालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील (शीव सर्कलजवळ) शीव उड्डाणपुलाचा विस्तार करीत आहे. या नव्या मार्गिकेमुळं ठाणे, चेंबूर, शीवमार्गे दक्षिण मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारा प्रवास वेगवान होणार आहे. या नव्या पुलासाठी पालिका 130 कोटींचा खर्च करीत असून डिसेंबर 2027 पर्यंत हा पूल बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील शीव सर्कल परिसरात गर्दीच्या वेळी वाहतूककोंडी होते. सध्या या पुलाला तीन मार्गिका आहेत. ठाणे पूर्व उपनगराकडे उत्तर दिशेने जाणाऱ्या गाड्यांसाठी दोन मार्ग आहेत आणि दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एक मार्गिका आहे. या पुलाला समांतर अतिरिक्त दोन मार्गिका उभारण्याचा निर्णय पालिकाने घेतला आहे.

सध्या अतिरिक्त दोन मार्गिकांची पायलिंगसह काही कामे सुरू झाली असून 25 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. या दोन अतिरिक्त मार्गिका असलेल्या पुलाची लांबी 1 हजार 320 मीटर आणि रुंदी 7.5 मीटर आहे.

शीव पुलाचा विस्तार हा मध्य रेल्वेच्या समन्वयाने बांधण्यात येणार आहे. या विस्तारित मार्गिकांमुळं शीव सर्कलजवळील वाहतुककोंडी फुटेल. तसंच, या मार्गिकांवरुन ठाण्याहून आल्यानंतर दक्षिण मुंबईकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या एकूण पाच मार्गिका उपलब्ध होतील.

त्यामुळे दररोज गर्दीच्या वेळी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे. नवीन पुलाच्या उभारणीमुळे अतिरिक्त जागा उपलब्ध होऊन रेल्वे मार्गिकेचा विस्तार करणे शक्य होणार आहे. मात्र पालिकेने या पुलाच्या मार्गिकांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Mumbai News
Infrastructure news